आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protest Over Pakistan Envoy Meeting With J&K Separatist

PHOTOS : फुटीरवादी नेत्यांच्या पाक उच्चायुक्तांशी झालेल्या भेटीनंतर हिंदू सेनेची निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राजधानी दिल्‍लीमध्ये प्रदर्शन केले.

नवी दिल्‍ली - जम्‍मू- काश्‍मीरमधील फुटीरवादी नेत्यांच्या पाकिस्तानी उच्चायुक्तांबरोबर बैठकीला सोमवारपासून सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी नवी दिल्ली येथे हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी दुतावासासमोर निदर्शने केली.
या दरम्यान, फुटीरवादी नेते साबीर शाह उच्चायुक्त बासीत अली यांना भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचले. या भेटीसंदर्भात सकारात्मक पवित्रा घ्यायला हवा, असे शाह म्हणाले. हा मुद्दा ज्यांच्याशी संबंधित त्यांच्याशी चर्चा करायची नाही, तर कोणाबरोबर करायची ? असा सवाल उपस्थित करत या चर्चेच काहीही गैर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे भारताच्या परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांची पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांबरोबर 25 ऑगस्टला इस्लामाबादमध्ये बैठक होणार आहे. त्यापूर्वी, फुटीरवादी नेत्यांना पाकिस्तानचे बोलावणे आल्याने अनेक पक्ष केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यातच ही चर्चा होत आहे.

पक्षांचा हल्लाबोल
काँग्रेस प्रवक्ते मनीष त‍िवारी यासंदर्भात म्हणाले की, 'विरोधी पक्षात असताना भाजप नेते खूप आक्रमक होते. पण आता ते शांत आहेत. पाकिस्तानने फुटीरवाद्यांना आमंत्रण दिले. त्यांची सेना घुसखोरी करत आहे. आयएसआयने भारताच्या अफगाणिस्तानातील दुतावासावर हल्ला केला. तरीही सरकार शांत आहे. बीजू जनता दलाच्या मते दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊन काहीही फायदा नाही. पक्षाच्या मते सीमेवर हल्ले सुरुच आहेत. त्यामुळे पाकिस्तानला चांगले संबंध प्रस्थापित करायचे नाही, हे सिद्ध होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारीक अन्वर यांच्या मते, दोन्ही देशांचे पंतप्रधान परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने फुटीरवादी नेत्यांना बोलवायला नको होते.

पुढे पाहा - या प्रकरणाशी संबंधित छायाचित्रे