आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protesters Demanding One Rank One Pension Evicted From Delhi\'s Jantar Mantar

वन रॅंक वन पेंशन: जंतरमंतरवर \'राहुल गांधी वापस जाओ\'च्या घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी - Divya Marathi
पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी
नवी दिल्ली- 'वन रँक वन पेंशन'च्या मागणीसाठी माजी सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज (शुक्रवार) जंतरमंतरवर पोहोचले. मात्र, धरणे आंदोलन करणार्‍या माजी सैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. राहुल गांधी व्यासपीठावर चढत असताना आंदोलकांनी त्यांना मध्येच रोखले. 'राहुल गांधी वापर जाओ' अशा घोषणाही दिल्या.

'वन रँक वन पेन्शन'साठी सुरू असलेल्या आंदोलनात राहुल गांधी यांनी पडू नये. जेव्हा त्यांचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा त्यांनी आमच्यासाठी काहीही केले नाही, असे आंदोलनात सहभागी माजी सैनिकांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, माजी सैनिकांनी देशाला आपले आयुष्य दिले आहे. पंतप्रधान आता तांत्रिक अडचणी पुढे करत आहेत. मात्र, याचा विचार त्यांनी देशातील जनतेला वचन देण्यापूर्वी करायला हवा होता. पंतप्रधानांनी आता 'वन रँक वन पेंशन' लागू करण्‍याची तारीख सांगावी‍, माजी सैनिकांना आता त्याचीच प्रतिक्षा असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकाराना संबोधित केले.

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मागी सैनिकांचे धरणे आंदोलन सुरु आहे. स्वातंत्र्य दिनानिर्मित दिल्लीत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस सकाळी जंतरमंतरवर पोहोचले. त्यांनी धरणे आंदोलन करणार्‍या माजी सैनिकांना मैदान रिकामे करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आंदोलकांनी त्यांना कडाडून विरोध केला. पोलिसांना कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
केजरीवाल-कॉंग्रेस आंदोलकांच्या पाठीशी...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. 'एक्स सर्व्हिसमेन यांना जबजबरीने जंतर-मंतरवरून उठवले जात आहे. ज्यांनी आपले आयुष्य देशाला दिले आता तेच देशाच्या सुरक्षिततेसाठी कसे अडथळा ठरु शकतात? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसने देखील माजी सैनिकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. पंतप्रधानांनी 'वन रॅंक वन पेंशनची मागणी तत्काळ मान्य करावी. तसेच त्यांनी माजी सैनिकांची माफी मागावी, असे कॉंग्रेस नेते आर.एस.सुरेजवाला यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, जंतरमंतरवरील माजी सैनिकांच्या आंदोलनाचे फोटो...