आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISRO चे 2 तास 15 मिनिटांचे सर्वात मोठे मिशन, 8 सॅटेलाइट्ससह PSLV-C35 लाँच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रोने आतापर्यंतचे सर्वात कठीण आणि लांप पल्ल्याचे मिशन PSLV-C35 सोमवारी लाँच केले. - Divya Marathi
इस्रोने आतापर्यंतचे सर्वात कठीण आणि लांप पल्ल्याचे मिशन PSLV-C35 सोमवारी लाँच केले.
चेन्नई - इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन (इस्रो) ने सोमवारी आतापर्यंतचे सर्वात कठीण आणि लांब पल्ल्याचे मिशन PSLV-C35 लाँच केले. हे रॉकेट 8 सॅटेलाइट्स दोन वेगवेगळ्या कक्षांमध्ये घेऊन गेले आहे. त्यात भारताचे तीन, अमेरिका, कॅनडा आणि अल्जेरियाच्या 5 सॅटेलाइट्सचा समावेश आहे. सॅटेलाइट्स कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी 2.15 तासांचा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. 9 वाजून 12 मिनिटांनी हे सॅटेलाइट लाँच करण्यात आले.
# भारताच्या SCATSAT-1 सॅटेलाइटद्वारे मिळणार समुद्र, हवामानाबाबत माहिती..
- यात सर्वात महत्त्वाचे सॅटेलाइट भारताचे SCATSAT-1 आहे. ते हवामान आणि समुद्रात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवेल. तसेच त्याच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देईल.
- 17 मिनिटांत रॉकेट त्याला 730 KM उंचीवर सोडेल. त्यासाठी 120 कोटी खर्च झाला आहे. भारताच्या या सॅटेलाइटचे वजन 377 KG आहे.
मिशनचे वैशिष्ट्य...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार सॅटेलाइट दोन वेगळ्या कक्षांमध्ये पोहोचवणारे इस्रोचे हे पहिले मिशन आहे. यात प्रथम आणि पिसाट हे दोन स्टुडंट सॅटेलाइट्सही नेण्यात आले आहेत.
- 'प्रथम' 10 किग्रॅ आणि बेंगळुरूच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले 'पिसाट' 5.25 किग्रॅ वजनाचे आहे.
- आईआईटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना 'प्रथम' बनवण्यासाठी 8 वर्षांचा वेळ लागला.
- हे सॅटेलाइट पृथ्वीच्या आभ्यासात मदत करणार आहेत.

मिशन कठीण का
- रॉकेट सोबत नेलेल्या सॅटेलाइट्सना वेगवेगळ्या कक्षेत सोडणार आहे.
- PSLV-C35 च्या लाँचिंगनंतर 16 मिनट 56 सेकंदात 730 किमी उंचीवर गेले.
- 4th स्टेजला इंजिन बंद होईल. 17 मिनिट 33 सेकंदाला सॅटेलाइट स्कॅटसॅट-1 रॉकेटपासून वेगळे झाले.
- 1 तास 22 मिनिट 58 सेकंदाला 4th स्टेजचे इंजिन पुन्हा सुरू केले जाईल.
- दोन तास 11 मिनिट 46 सेकंदात PSLV खाली 689.73 किमी उंचीवर येईल.
- त्यानंतर 4th स्टेजचे इंजिन बंद करून ड्युएल लाँच अॅडप्टरला PSLV पासून वेगळे केले जाईल. एकानंतर एक इतर सात सॅटेलाइट्स त्यांच्या ठरलेल्या कक्षेत सोडले जाईल.

कोणत्या देशाचे किती सॅटेलाइट्स..
- PSLV-C35 मध्ये विदेशातील 5 सॅटेलाइट्स आहेत. त्यात तीन अल्जेरियाचे आहेत. त्यांची नावे Alsat-1B 103kg, Alsat-2B 117kg, Alsat-1N 7kg आहेत. त्याचबरोबर कॅनडाचे NLS-19, 8kg आणि अमेरिकेचे Pathfinder-44kg यांचाही समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, Video आणि PHOTO
बातम्या आणखी आहेत...