आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएसयू-बँक अधिकारी अाता क्रिमी लेअरमध्ये; त्यांच्या मुलांना ओबीसी अारक्षण मिळणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने आरक्षणासाठी क्रिमी लेअरच्या कक्षेत सार्वजनिक उपक्रम (पीएसयू), विमा कंपन्या व बँकांचाही समावेश केला आहे. आता या संस्थांमधील अधिकारी व त्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. 

ओबीसींना १९९३ मध्ये २७% आरक्षण दिल्यानंतर हा मुद्दा उपस्थित होत होता. बुधवारी कॅबिनेट बैठकीत निर्णयानुसार ‘ग्रुप ए’ व ‘ग्रुप बी’च्या पदांसाठी लावलेले निकष पीएसयू, बँका आणि वित्तीय संस्थांत समान पदांवर लागू होतील. दोन्ही ग्रुपचे कर्मचारी क्रिमी लेअरमध्ये येतात. नव्या पद्धतीनुसार पीएसयू व बँकांतील ‘ग्रुप ए’ व ‘ग्रुप बी’च्या समकक्ष पदेही क्रिमी लेअरच्या कक्षेत येतील. 

यांना होणार लाभ
पीएसयू व वित्तीय संस्थांतील कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मुलांना याचा थेट लाभ होईल. त्यांना इतर सरकारी विभागांत कार्यरत आपल्या समकक्ष कर्मचाऱ्यांच्या मुलांप्रमाणे ओबीसी आरक्षण मिळेल.
बातम्या आणखी आहेत...