आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफा वाढला तरी बोनस गेल्या वर्षीएवढाच, बोनस देण्यात खासगीपेक्षा सरकारी कंपन्या आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ जयपूर/अहमदाबाद/ मुंबई - एशियन पेंट कंपनीमध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत सचिन सिंह या दिवाळीला कार खरेदी करण्याच्या विचारात आहेत. बोनसवर आशा टिकून होती. मात्र, या वर्षीही त्यांना ४० हजार रुपये मिळाले. त्यांना जास्त बोनस मिळण्याची आशा होती. तो न मिळाल्याने आता बचतीचा पैसा काढावा लागणार आहे. ही स्थिती सेलमध्ये काम करणारे राजेंद्र पिल्ले यांची आहे. बोनसची मोठी रक्कम बचत खात्यात टाकण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र, त्यांना केवळ १८ हजार रुपये मिळाले आहेत. यात दोन मुले, पत्नीचे कपडे आणि अन्य थोडीफार खरेदी होऊ शकेल.

साधारण दशकभरानंतर एकाच महिन्यात मोठे सण आले आहेत. नवरात्र, दसरा, ईद, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी आणि छटपूजा. वर्षभरातील विशेष खरेदी करण्यासाठी बोनसवर आशा टिकून होत्या.

मात्र, २०१२-१३ च्या तुलनेत २०१३-१४ आर्थिक वर्षात खासगी कंपन्यांचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला असतानादेखील बोनस वाढला नाही. ही रक्कम गेल्या वर्षीप्रमाणेच
आहे. ऑटो क्षेत्रात घसरण असतानाही १५ टक्क्यांची वाढ करणा-या मारुती सुझुकीने या वेळी ८४०० बोनस देण्याचे जाहीर केले आहे.

आशियातील सर्वात मोठी कॉल सेंटर कंपनी जेनपॅक्टच्या कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा बोनस ठरलेला असतो आणि तो पद आणि श्रेणीनुसार मार्च महिन्यातच दिला जातो.
यामध्ये हरियाणाच्या एलपीएस आणि एलपीएस बोसार्डचा समावेश आहे. कॉर्पोरेट उद्योगाप्रमाणे चित्रपट उद्योगामध्ये बोनस दिला जातो. येथे एक महिन्याच्या वेतनाइतका बोनस मिळतो. यामध्ये जास्त बोनस देण्यात सरकारी कंपन्यांनी बाजी मारली आहे.
पुढे पाहा खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांमधील बोनसचा फरक