आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक ग्रंथालयांचे रूपडे बदलणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाचनाच्या सवयीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय ग्रंथालय मोहिमेअंतर्गत या वर्षी सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात येणार आहेत. ज्ञान आणि माहिती मिळवण्यात सार्वजनिक ग्रंथालये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाच्या (आयसीटी) साहाय्याने नागरिकांना फिजिकल आणि डिजिटल सामग्री देण्याचा प्रयत्न आहे, असे सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव रवींद्र सिंग यांनी सांगितले.
कोलकाता येथील राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनमार्फत 400 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून देशभरातील 629 जिल्ह्यांच्या ग्रंथालयात सुधारणा करण्यात येणार असून त्यांना एकमेकांना जोडण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 3 फेब्रुवारी रोजी कोलकात्यातून त्याची सुरुवात होईल. वाचनालयांत पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच त्यांना तंत्रज्ञान पुरवण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रंथालयांमध्ये आधुनिक फर्निचरसह वायफाययुक्त रीडिंग रूम तयार केल्या जातील. त्यामध्ये लायटिंग सिस्टिम, ज्येष्ठ तसेच अपंग नागरिकांसाठी स्वतंत्र सोय असेल, वॉशरूमसह शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध केली जाईल. याव्यतिरिक्त मुलांना खेळाची सुविधा, इंटरनेट, कॉन्फरन्स, रेकॉर्डिंग रूम, ट्रेनिंग कम मीटिंग रूम असेल. या सुविधांसह नवीन ग्रंथालये निर्माण करणे व्यवहार्य नाही, त्याऐवजी जुन्या संस्थांमध्ये सुविधा दिल्या जातील, असे राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनचे महासंचालक के. के. बॅनर्जी यांनी सांगितले. सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विविध भाषांमधील साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या निमित्ताने जगभरातील साहित्य मिळू शकेल.