आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वॉन्टेड’ करचुकव्यांची नावे, पत्ते वेबसाइटवर प्रसिद्ध करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सराईत करचुकव्या थकबाकीदारांची लोकांची नावे व पत्ते प्रसिद्ध करण्याचा निर्णय प्राप्तीकर विभागाने घेतला आहे. करचुकवेगिरी करणार्‍या अशा धूर्त लोकांची नावे एकत्रित करून ती विभागाच्या वेबसाइटवर अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

ज्यांच्या नावे कराची मोठी रक्कम थकित आहे, ज्यांनी वारंवार कर चुकवला आहे किंवा जे लोक संबंधित पत्त्यावर सापडतच नाहीत अशा करदात्यांची नावांना जाहीर प्रसिद्धी दिली जाणार असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांची ‘सीबीडीटी’मध्ये (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) नुकतीच एक बैठक झाली. वेळेवर करभरणा करण्याच्या दृष्टीने विभागाने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अजूनही काही ‘हुश्शार’ करदात्यांनी भरणा केलेला नाही. या लोकांची नावे व पत्ते ‘वॉन्टेड’च्या यादीत प्रसिद्ध केले जातील. पोलिस, सीबीआय, एनआयएसारख्या तपास संस्था ज्याप्रमाणे आरोपींची यादी प्रसिद्ध करतात तशा पद्धतीने करचुकव्यांची नावे प्रसिद्ध होणार आहेत.