आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65व्या वर्षी अशी चालवते स्कूटी, लोक म्हणतात.. गावातील डॉक्टर आणि अॅम्ब्युलन्सही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - छत्तीसगडची नवी राजधानी उपरवारा. पुनौतीनबाईंची कर्मभूमी. कोणालाही त्यांचा पत्ता विचारल्यास ते तत्काळ उत्तरतात.. डॉक्टरीणबाई. ६५ वर्षांची पुनौतीनबाई डॉक्टर नाहीत, परंतु त्यांचे काम इतरांसाठी नक्कीच आदर्शवत ठरावे असे आहे. या वयातही त्या गावातील आणि पंचक्रोशीतील लोकांना दुचाकीवरून मोठ्या आस्थेने रुग्णालयात पोहोचवतात. मग अगदी दिवस असो की रात्र.. त्यांची सेवा अखंडपणे सुरू असते.

प्रत्येक घरातील नवजात बालकाची कोणत्या महिन्यातील कोणती लस राहिली आहे हे त्यांना पक्के ठाऊक असते. तारखेसह. बरोबर त्या दिवशी स्कूटी घेऊन संबंधित घरासमोर येऊन त्या थांबतात. म्हणूनच आजूबाजूचे लोक त्यांना ‘अॅम्ब्युलन्स’ म्हणूनही ओळखू लागले आहेत. पुनौतीनबाईंना डॉक्टरांइतके ज्ञान आहे, अशी गावकऱ्यांची त्यांच्याविषयीची भावना आहे. कोणत्या आजारात कोणत्या गोष्टींचे पथ्य पाळायला हवे आणि अधिक आजार असल्यास रायपूरच्या कोणत्या दवाखान्यात जायला हवे हेही त्या सांगतात.
उपरवाराच्या सरपंच रामबाई साहू म्हणाल्या, गावातील सगळे लोक त्यांना डॉक्टर म्हणतात. पुनौतीन यांच्यामुळे गावातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली आहे. पुनौतीनबाईंची व्यथा मात्र वेगळी आहे. तिसरीत होते तेव्हा आईने शाळेला जाण्यास मनाई केली होती.
सहाव्या वर्षी विवाह झाला. १२ व्या वर्षी सासरी आले. मुले मोठी झाली. तोपर्यंत ४० वर्षांची झाले होते. मग शिक्षणाला सुरुवात झाली. पाचवी उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर आठवी. गावात आरोग्यसेवा नाही. त्यासाठी वैद्य विशारदचा अभ्यास सुरू केला, जेणेकरून त्यातून काही गोष्टी शिकता येऊ शकतील आणि लोकांना जडीबुटीच्या उपचारापासून वाचवता येऊ शकेल, असे त्या सांगतात.

डॉक्टरांएवढा गावकऱ्यांचा विश्वास
गेल्या २५ वर्षांपासून त्या गावाची सेवा करत आहेत. पुनौतीनबाईंवर गावकरीही तितकाच विश्वास ठेवतात. अगदी डॉक्टरांएवढा. अलीकडेच त्यांनी महिलांसाठी विशिष्ट प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. माझी मुले मोठी झाली. स्वत:च्या पायावर उभी आहेत. त्यामुळे मी लोकांच्या सेवेचा विडा उचलला आहे. गावातील लोकांमध्ये आरोग्य आणि शिक्षणासंबंधी जागृती निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून लोकांना आपल्या जीवनाचा स्तर आणखी उंचावता येऊ शकेल, असे पुनौतीनबाईंनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गावाच्या सेवेत व्यस्त पुनौतीनबाई
बातम्या आणखी आहेत...