आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab, Goa Assembly Election 2017 Live Updates Polling In Punjab And Goa (83%) Ends

गोव्यात विक्रमी 83% मतदान, गेल्या वेळपेक्षा 2 टक्क्यांनी वाढले; पंजाबात 70% मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड/ पणजी- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी  पंजाब आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. पंजाबमध्ये ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर गोव्यात विक्रमी ८३ टक्के मतदान झाले. त्यात ६ जण जखमी झाले. गोव्यात मात्र मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.  काँग्रेस आणि भाजप या प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (आप) दोन्ही राज्यांत निवडणूक मैदानात उतरल्याने ही निवडणूक तिरंगी झाली.
 
 
गोव्यात 40 जागांसाठी एकूण 251 उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. तर पंजाबात 117 जागांसाठी एक हजार 145 उमेदवार रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी खासदार पदाचा राजीनामा दिल्यामुळे अमृतसर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. 
 
वेलिंगकरांनी व्यक्त केला बहुमताचा विश्वास
- गोव्यात मतदानासाठी पोहोचलेले पर्रीकर म्हणाले, सकाळपासूनचा ट्रेंड सांगत आहे की यंदा गोव्यात मतदानाचा टक्का वाढला आहे. गेल्या वेळी 81% मतदान झाले होते, त्यापेक्षा जास्त मतदानाची आपेक्षा पर्रीकरांनी व्यक्त केली होती. सायंकाळी पाचनंतर समोर आलेल्या आकडेवारीवरुन त्यांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरलेली दिसली.
- पर्रीकरांना जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, मला दिल्ली पेक्षा गोव्याचे जेवण जास्त आवडते. आता याचा काय अर्थ काढायचा हे तुम्ही ठरवा. 
- महाराष्ट्र विधानसभेत भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने गोव्या गोवा सुरक्षा मंचसोबत निवडणूक लढली. 
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर यांनी सकाळी मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना वेलिंगकरांनी सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, 'महाराष्ट्र गोमंतक पार्टी, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना युती राज्यात 22 जागांवर विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल.'
- वेलिंगकरांनी हे देखिल म्हटले, की संघाचे स्वयंसेवक यंदा भाजपला मतदान करणार नाहीत. यामुळे भाजप नक्कीच अडचणीत येणार आहे. 

 आप गोव्यात प्रथमच 
 - आम आदमी पार्टी प्रथमच गोवा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे.
 - पंजाबमध्ये 10 वर्षांपासून सत्तेत असलेले अकाली - भाजप, आणि विरोधीपक्ष काँग्रेस यांच्यासोबत यंदा आपनेही मुसंडी मारली आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे.
- 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल यांच्या लंबी मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यांनी ही शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद जनतेला घातली तर काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमरिंदर सिंग येथे त्यांच्या विरोधात आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग पटियाला येथूनही लढत आहेत.
 
एका नजरेत निवडणूक 
 - गोवा - 40 जागा, पंजाब 117 जागा.
 - उमेदवार गावा - 250, पंजाब 1145
 - मतदार - गोवा -11 लाख, पंजाब - 1.98 कोटी 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)