आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab Terror Attack Former Punjab Chief Minister Beant Singh Killed

RECALL: 20 वर्षांपूर्वी झाला मोठा दहशतवादी हल्ला, मुख्यमंत्र्यांचा गेला होता जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1995 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्या कारवार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. इन्सेट - बेअंतसिंग. (फाइल फोटो) - Divya Marathi
1995 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्या कारवार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. इन्सेट - बेअंतसिंग. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - पंजाबच्या गुरुदासपूर येथे सोमवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. 20 वर्षांनंतर पंजाब पुन्हा एकदा दहशतवादाने हदरले आहे. आजच्या सारखाच दहशतवादी हल्ला 20 वर्षांपूर्वी 31 ऑगस्ट 1995 मध्ये झाला होता. पंजाबचे तत्कालिन मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्या कारला खलिस्थान समर्थक दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. हल्ल्यात मुख्यमंत्र्यांसह 15 लोक मारले गेले होते आणि 30 जखमी झाले होते. त्यानंतर पंजाबमध्ये सर्वातमोठा हल्ला सोमवारी झाला.
काय होते प्रकरण
खलिस्थानी दहशतवाद्यांनी बेअंतसिंग यांना ठार करण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. त्याशिवाय या हल्ल्यातील दिलावर सिंग याने पंजाब - हरियाणा सचिवालयाबाहेर स्वतःला बॉम्बने उडवून दिले होते. बेअंतसिंग यांच्या हत्येचा कट बब्बर खालसाचे दहशतवादी जगतारसिंग तारा, जगतारसिंह हवारा, परमजीतसिंग भ्योरा आणि देवीसिंग यांनी रचला होता. या सर्व दहशतवाद्यांना 1996 मध्ये अटक करण्यात आली होती. चंदीगडच्या बुरैल तुरुंगातून ते 2004 मध्ये 90 फुटांचा भूयार खोदून फरार झाले होते.
थायलंडमधून पकडले होते ताराला
तुरुंगातून फरार झाल्यानंतर जगतारसिंग तारा थायलंड आणि मलेशियामध्ये वेष बदलून लपून बसला होता. त्याला 2014 मध्ये भारतीय यंत्रणांनी थायलंडच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आयएसआय एजंट सुलतान बारीचा भाऊ खलत बारीच्या घरून अटक केली होती. त्यानंतर थायलंडने जगतारसिंगचे प्रत्यार्पण केले होते. या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड बलवंतसिंग राजोआनाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो पटियाला तुरुंगात कैद आहे.
पुढील स्लाइडमध्ये, आतापर्यंत देशात झालेले दहशतवादी हल्ले