आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Purandeshwari News In Marathi, BJP, N.T.Ramarao, Telugu Desham Party

पुरंदेश्वरी यांचा भाजपमध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री पुरंदेश्वरी यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी भाजपचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. तेलंगणा राज्य निर्मितीच्या विरोधात त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पुरंदेश्वरी तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या कन्या आहेत. मात्र, त्या स्वत: या पक्षात नव्हत्या. 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्या विशाखापट्टणमहून निवडून आल्या होत्या.


संगमा भाजपच्या वाटेवर : लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. सूत्रांनुसार संगमा यांनी शुक्रवारी भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावर संगमा यांनी शरद पवारांना साथ देत राष्‍ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. नंतर ते खासदारही झाले. राष्‍ट्रपतिपदाची निवडणूक लढवताना त्यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.