आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्विक सर्व्हिस रेस्तराँ ३० % वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ब्रँडेड क्विक सर्व्हिस रेस्तराँ(क्यूएसआर) कंपन्या आपली आऊटलेट्स लहान शहरांत सुरू करण्याच्या तयारीत असल्यामुळे देशातील तरुण आणि नोकरदार वर्गात फास्ट फूड संस्कृती वाढत आहे. लहान शहरांत राहणाऱ्या लोकांना पिझ्झा हट, केएफसी, सागर रत्ना, यो चायना, डोमिनोज आणि मेक डोनाल्ड यासारख्या रेस्तराँ ब्रँड चेनचे पिझ्झा, बर्गर, इडली, दोसा, नूडल्स यासारखी उत्पादने सहज मिळू शकतील. रेस्तराँ चेन कंपन्या आपल्या मेन्यूमध्ये बदल करून नवी उत्पादने जोडत आहेत. त्यामुळे लोकांना चालता-चालता असे खाद्यपदार्थ मिळू शकतील. २०१५-१६ मध्ये २० ते ३० टक्के आणि नवे रेस्तराँ आपल्यासोबत जोडण्याची कंपन्यांची योजना आहे. शहरात टॅक्सी सेवा देणाऱ्या ओलाने ओला कॅफे मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहक ऑर्डर देऊ शकतील आणि पुढील २० मिनिटांत तुमच्यापर्यंत ही ऑर्डर ओला पाेहोचवेल.
कंपनीने प्रायोगिक स्तरावर मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमध्ये निवडक ठिकाणी ही सुविधा सुरू केली आहे. देशाच्या एकूण चेन फूड मार्केटमध्ये संघटित क्यूएसआरची भागीदारी जवळपास २० टक्के आहे. पिझ्झा हट, केएफसी, कोस्टा कॉफीमध्ये सर्वात मोठी फ्रँचायझी चेन आणि स्वत:चा दक्षिण भारतीय ब्रँड वांगो चालवारी कंपनी देवयानी इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि सीईओ विराग जोशी यांनी दिव्य मराठी नेटवर्कला सांगितले, सध्या आमची ७० पेक्षा जास्त शहरांत ५०० पेक्षा जास्त आऊटलेट्स आहेत. २०१५ मध्ये १०० नवी आऊटलेट्स सुरू करण्याची योजना आहे. देशातील नोकरदार महिला आणि तरुण घरापासून बाहेर बराच काळ असतात. मित्रांसोबत फिरणारे तरुणही क्यूएसआरचे अन्नपदार्थ खाण्यास पसंती देतात. दक्षिण भारतीय फूड ब्रँड चेन कंपनी सागर रत्नाचे सीईओ मुरलीकृष्णन परना म्हणाले, सुरुवातीस २०० फूड अायटम केले जात होते. मात्र, आता १०० आयटम करण्यात आले आहेत. आमच्या विक्रीत ८० टक्के वाटा इडली, दोसा, वडा आणि उत्तप्पाचा आहे. सध्या लाेकांकडे वेळ कमी आहे. रेस्तराँमध्ये बसून जेवण करण्यापेक्षा घर ते कार्यालय-विद्यापीठादरम्यान जेवण करणे पसंत करतात. अशा स्थितीत सोयीस्कर फूड प्राॅडक्ट लाँच करण्याची आमची योजना आहे. आम्ही तयार इडली, वडा, लाँच करणार आहोत. अशी आऊटलेट्स दिल्लीत उघडली जातील.
सागर रत्नाचे देशात ७८ रेस्तराँ असून ही संख्या १०० करण्याची योजना आहे. कंपनी मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडसारख्या राज्यांत विस्तार करणार आहे.
{ दक्षिण भारतीय रेस्तराँ चेन सागर रत्नाने २०० आयटमऐवजी १०० मेन्यू केले
{ दोसा, इडली आणि वडा पार्सलद्वारे मिळू शकतील
{ या वर्षी चायना वर्ग-१ आणि वर्ग-२ शहरांमध्ये २० आऊटलेट्स उघडणार