आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Quake Hit Girls Made Sex Slaves In Saudi Then Gang Raped In Gurgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदीच्या सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या भूकंपाने बेघर झालेल्या नेपाळी तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव/नवी दिल्ली- सौदी अरबच्या राजनायिक अधिकार्‍याच्या (डिप्लोमॅट) गुडगावातील फ्लॅटमधून पोलिसांनी दोन नेपाळी तरुणींची सूटका केली आहे. दोन्ही तरुणींवर अनेक महिन्यांपासून या फ्लॅटकध्ये बंदिस्त होत्या. त्यांच्या अनेकदा बलात्कारही झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दोन्ही पीडित तरुणी नेपाळमधील भूकंपग्रस्त आहेत. त्या नोकरीच्या शोधात दिल्लीत आल्या होत्या. मात्र, त्यांची फसवणूक करून त्यांना सौदी अरबमध्ये नेऊन सेक्स रॅकेटच्या दलदलीत ढकलण्यात आले होते.

मागील एप्रिल महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने बेघर केलेल्या या तरुणी नौकरीच्या शोधात दिल्ली आल्या होत्या. दोन्ही पीडित तरुणींसह 28 तरुणींना सौदी अरबमध्ये देहविक्री करण्‍यासाठी नेण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळी तरुणींनी राजनायिक अधिकार्‍यावर फ्लॅटमध्ये डांबून ठेवून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर सौदी अरबमध्ये नेऊन सेक्स स्कॅंडलच्या दलदलीत ढकलल्याचाही आरोप केला आहे.अधिकार्‍यांनी दोघींना तीन-चार महिन्यांपासून दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले आहे. सौदी दुतावासाने हा फ्लॅट भाड्याने घेतला आहे.

एका मेडने या प्रकरणाचा भांडाफोड केला. तिने एका एनजीओच्या मदतीने या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. गुडगाव पोलिसांनी डीएलएफ फेज-।। मध्ये छापा टाकून दोन्ही तरुणींची सुटका केली.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...