आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Question Raised On Secret Mission Of Narendra Modi Which Claimed To Have Saved 15000 People

15 हजार लोकांना मोदींनी कसे वाचविले? राजनाथ सिंहांनी मागितले स्‍पष्‍टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तराखंडमध्‍ये आलेल्‍या प्रलयानंतर अजूनही शेकडो नागरिक अडकलेले आहेत. नागरिकांना वाचविण्‍यासाठी सैन्‍याचे अथक परिश्रम सुरु आहेत. परंतु, गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक करिष्‍मा केला. एका गुप्‍त मोहिमेद्वारे त्‍यांनी तब्‍बल 15 हजार गुजराती पर्यटक आणि भाविकांना राज्‍यात परत नेले. या मोहिमेची खूप चर्चा झाली. मोदींची प्रतिमा एखाद्या हिरोप्रमाणे उभी झाली. परंतु, खरोखर मोदींनी 15 हजार जणांना सुरक्षितपणे गुजरातमध्‍ये परत नेले का? या मोहिमेवर भारतीय जनता पार्टीचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहे.

मोदींनी रविवारी ही मोहिम फत्ते केली. परंतु, हे कसे साध्‍य केले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. स्‍वतः नरेंद्र मोदी किंवा गुजरात सरकारच्‍या अधिका-याने हा दावा केलेला नाही. त्‍यामुळे मोदींच्‍या वतीने ही माहिती कोणी दिली? मोदींचा या बातमीला दुजोरा नव्‍हता तर त्‍यांनी जाहीरपणे वृत्त फेटाळले का नाही, असाही प्रश्‍न उपस्‍ि‍थत होते आहे.

राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात मोदींकडे विचारणा केली. यासंदर्भात मोदींनी सांगितले की, अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्‍य माझ्याकडून देण्‍यात आलेले नाही. ही माहिती कुठुन आली, याबाबत कल्‍पना नाही, असे मोदी म्‍हणाले.

नरेंद्र मोदींच्‍या या बचाव मोहिमेची बातमी त्‍यांचा जनसंपर्क पाहणा-या ऍपको वर्ल्‍डवाईड या प्रसिद्ध अमेरिकन कंपनीने एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित करुन आणली होती. हा दावा या वृत्तपत्राच्‍या संपादकीयमध्‍ये करण्‍यात आला आहे. संपादकीय लेखातील माहितीनुसार, ही कंपनी 2007 पासून मोदींशी जुळलेली आहे. मोदींची प्रतिमा उंचाविण्‍याचे काम या कंपनीकडे होते. त्‍यासाठी कंपनीला दरमहा 13-15 लाख रुपये देण्‍यात येत आहे.

देशाचे सैन्‍य 10 दिवसांमध्‍ये 40 ते 50 हजार लोकांना वाचविण्‍यात यशस्‍वी झाले. परंतु, मोदींनी केवळ दोन दिवसांमध्‍ये 15 हजार जणांना वाचवून चमत्‍कार केला. हे कसे काय, असा प्रश्‍न उपस्थित करण्‍यात येत आहे.