आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्ट क्रांती : आजच शहीद झाले होते 940 भारतीय, 60 हजार जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहरूंसह काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांना अटक झाली होती. - Divya Marathi
नेहरूंसह काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांना अटक झाली होती.
नवी दिल्ली - 1942 मध्ये आजच्या दिवशी महात्मा गांधींनी 'क्विट इंडिया' आणि 'करा किंवा मरा' चा नारा दिला होता. याच दिवशी महात्मा गांधी आणि काँग्रेस नेत्यांसह 60 हजार जणांना अटक करण्यात आली. तसेच व्यापक आंदोलनात 940 जणांनी आपल्या जिवाची आहुती दिली.

'करा किंवा मरा'
9 ऑगस्टच्या पहाटे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा बड्या नेत्यांसह काँग्रेसस कमिटीच्या सर्वच नेत्यांना अटक करण्यात आली होती. काँग्रेसला अवैध संस्था घोषित करण्यात आले होते. मात्र, पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते जय प्रकाश नारायण, राममनोहर लोहिया आणि अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले. गांधींनी या आंदोलनासाठी 'करा किंवा मरा' असा नारा दिला होता. 

940 भारतीय शहीद
सरकारी आकडेवारीनुसार, या आंदोलनात 940 भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच 60,229 लोकांना अटक करण्यात आली होती. खास 'क्विट इंडिया' मूवमेंटला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेच्या दोन्ही सभाहांत बुधवारी विशेष बैठक बोलावण्यात आली.

पुढील स्लाईड्सवर आंदोलनाचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...