आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R Atal Bihari Vajpayee Treatment Expenses Control

वाजपेयींवरील उपचार खर्च जाहीर करा - सीआयसी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपचारावरील खर्च 15 दिवसांत जाहीर करण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. माहिती अधिकारांतर्गत दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणीत खर्चाचा तपशील आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध असायला हवा, असे मुख्य माहिती आयुक्त सत्येंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे.

उपचार खर्चाची माहिती न देता आरोग्य मंत्रालय अर्ज वेगवेगळ्या विभागांकडे पाठवत असल्याबद्दल आयोगाने आश्चर्य व्यक्त केले. आरोग्य मंत्रालयाने खर्चाचा तपशील जमा करण्याचे कष्ट घेतले नाहीत. उपचार खर्चाची माहिती जिथे उपलब्ध असेल तेथून घ्यावी आणि मोरादाबाद येथील अर्जदाराला देण्याचे निर्देश मिर्शा यांनी दिले. अर्जदाराने पंतप्रधान कार्यालयाकडे यासंबंधीची माहिती मागितली होती.