आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP खासदारांचा घरचा आहेर- बिहारमध्ये विकले जात आहे तिकीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरुन भारतीय जनता पक्षाचे खासदार आर.के.सिंह यांनी पक्षाला घरचा आहेर दिली आहे. भाजप खासदार सिंह म्हणाले, तिकीटांची बोली लावली जात असून गुन्हेगारांना उमेदवारी दिली जात आहे. असेच होणार असेल तर लालू आणि तुमच्यात काय फरक राहिला, असा सवाल सिंह यांनी पक्षश्रेष्ठींचे नाव न घेता विचारला आहे.
आर.के.सिंह यांचे आरोप
सिंह म्हणाले, बिहारमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी माझ्या फोनला उत्तर देत नाहीत. राज्यात विधानसभेसाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीटे दिली जात आहेत. सिंह यांनी बिहार प्रदेश भाजपवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, तिकीटांसाठी पैसे घेतले जात आहेत.
पक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगत सिंह यांनी आरोप केला, की स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना डावलेले जात असून गुन्हेगारांना सहज तिकीट मिळत आहे.
नाराजी दूर करण्यासाठी अमित शाहांनी केला फोन ?
आर.के.सिंह हे पक्षात नवीन असले तरी बिहार आणि दिल्लीतील राजकीय वर्तूळासाठी नवखे नाहीत. माजी गृहसचिव राहिलेले सिंह आता भाजप खासदार आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी प्रयत्न केले आहे. शाह यांनी शनिवारी सिंह यांना फोन केल्याची चर्चा आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देखील आर.के.सिंह यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.