आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhe Maa Brothers And Father Was Imprisoned For 10 Year In Punjab

राधे माँचे भाऊ आणि वडिलांनी 10 वर्षे काढली तुरुंगात, हुंडाबळीचे होते प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ सुखबिरसिंगच्या लग्नात राधे माँ. - Divya Marathi
भाऊ सुखबिरसिंगच्या लग्नात राधे माँ.
अमृतसर - कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात अडकलेल्या राधे माँ संबंधी आणखी एक खुलासा झाला आहे. राधे माँचे दोन भाऊ आणि वडील हुंडाबळी आणि खूनाच्या आरोपात 10 वर्षे तुरुंगात होते.

राधे माँचा भाऊ सुखबिरसिंग याचे पंजाबातील बलविंदर कौरसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर सात वर्षात तिचा मृत्यू झाला होता. बलविंदर कौरचे वडील हरभजन सिंग यांनी सुखबीरसिंगवर हुंडाबळीचा खटला दाखल केला होता.
हरभजनसिंग यांच्या म्हणण्यानूसार, 30 नोव्हेंबर 1995 रोजी गुरदासपूर येथील सुखबिरसिंगसोबत बलविंदर कौरचे लग्न झाले होते. लग्नानंतर सातच वर्षात त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. ते जेव्हा मुलीच्या घरी गेले तेव्हा अंगणात तिचा मृतदेह पडलेला होता. त्यांनी 5 जून 2002 रोजी दोरांगल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. हरभजन यांचा आरोप होता, की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी सासरचे लोक छळ करत होते. पोलिसांनी कारवाई करत राधे माँचे वडील अजीतसिंग आणि भाऊ सुखबिरसिंग आणि आणखी एका भावाला 10-10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राधे माँच्या भावाच्या लग्नाचे फोटोज..