आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँच्या प्रत्येक बोटात हिर्‍या-मोत्याची अंगठी, 6 मजली बंगल्यातून सुरु होता बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली/मुंबई - कौटुंबिक छळाच्या गुन्हात अडकलेल्या राधे माँ बद्दल रोज नवेनवे खुलासे होते आहेत. पंजाबातून मुंबईत आलेल्या राधे माँने धर्माच्या नावावर गोरखधंदाच सुरु केला असल्याचा खुलासा नुकताच एका टीव्ही चॅनलने केला आहे. 'माता की चौकी' लावण्याचा राधे माँ भक्तांना आग्रह करत असायची. त्यासाठी काही लोकांना विश्वासत घेऊन कमीशनचे आमिष देखील दाखवले जात होते. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राधे माँ धर्माच्या नावावर एक प्रकारचे रॅकेट चालवत होती. हे रॅकेट समाजातील उच्चभ्रू आणि वलायांकित चेहरे शोधून त्यांना गंडा घालत होते.
राधे माँच्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये अंगठ्या असतात. हाताच्या दहा बोटांमध्ये हिरे आणि सोने-चांदीच्या अंगठ्या राधे माँ घालते. बोरिवलीत तिचा सहा मजली बंगला आहे, येथूनच सर्व बिझनेस चालतो. प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटींसोबतचे फोटो छापून जाहिरत दिली जाते आणि गर्दी जमवता येऊ शकते ही ट्रीक राधे माँला अवगत झाली होती. त्यानंतर त्या गर्दीकडून पैसे कसे उकळायचे हे राधे माँच्या सहकाऱ्यांना कळालेले होते.
13 वर्षांपासून मुंबईत राधे माँची चौकी
अशीही माहिती पुढे येत आहे, की 13 वर्षांपूर्वी राधे माँ नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली.(राधे माँने देवीच्या फोटोवर लावला होता स्वतःचा चेहरा, सोडावे लागले पंजाब) मात्र, सर्वसाधारण कुटुंबातील बब्बूला ग्लॅमरस लुक देण्याचे काम मुंबईतील व्यवसायिक एम.एम. गुप्ता आणि त्यांचे कुटुंबियांनी केले. गुप्ता कुटुंबांने बोरिवलीतील त्यांच्या राहात्या घरी राधे माँची चौकी सुरु केली. त्यांच्या घराचे दोन मजले त्यांनी राधे माँच्या दर्शनासाठी दिले. येथूनच राधे माँचा धर्माच्या नावाने बिझनेस सुरु झाला.
काही प्रसिद्ध व्यक्ती, व्यवसायिक यांना इतर राज्यांमध्येही चौकी लावण्याचा आग्रह केला जात होता. तुमच्या परिचयातील तेथील लोकांना राधे माँच्या दर्शनासाठी येण्यास सांगा असा आग्रह केला जात होता. त्यासाठी कमीशन दिले जाईल अशी ऑफरही दिली जात असल्याचा चॅनलचा दावा आहे.
अॅड बिझेनस झाला हिट
गुप्ता कुटुंबाच्या घराचे नाव नंतर राधे माँ भवन ठेवण्यात आले. त्यांनी राधे माँच्या जाहिराती देण्यास सुरुवात केल्यानतंर त्यांचा बिझनेस देखील दुपटीने वाढला. गुप्ता कुटुंबाने मग राधे माँला ग्लॅमर गर्लच्या रुपात सादर केले. राधे माँ तिच्या कार्यक्रमात कायम नववधुच्या पेहरावात असते. तिच्या दर्शनासाठी स्पेशल सेट डिझाइन केला जातो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी ग्लॅमरस असते राधे माँची चौकी