आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुहे सारख्या रुममध्ये भक्तांना भेटते राधे माँ, टल्ली बाबा फिक्स करतो मिटींग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे माँचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला स्कर्टमधील फोटो आणि टल्ली बाबा. - Divya Marathi
राधे माँचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला स्कर्टमधील फोटो आणि टल्ली बाबा.
नवी दिल्ली/मुंबई - राधे माँने धर्माच्या नावाने मोठा बिझनेस उभा केला होता, हे आता उघड होत चालेले आहे. राधे माँ बद्दल रोज नवे नवे खुलासे होत आहेत. सोशल मीडियावर राधे माँचे स्कर्टमधील फोटो व्हायरल झाले त्यासोबतच हिंदी गाण्यांवर डान्स करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. सध्या फरार असलेली आणि स्वतःला देवीचा अवतार सांगणारी राधे माँचा बिझनेस टल्ली बाबा चालवतो. टल्लीबाबाच भक्तांसोबतच्या तिच्या अपॉइंटमेंट फिक्स करतो. गुहे सारख्या एका खोलीत राधे माँ विशेष भक्तांची भेट घेते आणि त्यांच्या समस्या जाणून घेते. मात्र समस्यांचे उत्तर काही राधे माँ सांगत नाही. ती शांतपणे सर्व ऐकून घेते आणि कायम तिच्यासोबत राहत असलेली छोटी माँ भक्तांच्या प्रश्नांना उत्तर देते.
राधे माँची अपॉइंटमेंट कोणालाही सहजा सहजी मिळत नाही आणि राधे माँ विना अपॉइंटमेंट कोणाला भेटत देखील नाही. टल्ली बाबाच्या माध्यमातूनच राधे माँ पर्यंत जाते येत असे. याशिवाय 'माता की चौकी' या राधे माँच्या कार्यक्रमात आणि शोभायात्रांदरम्यानच राधे माँचे दर्शन होत होते.
राधे माँची महामंडलेश्वर उपाधी घेतली परत
राधे माँला 2012 च्या कुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदवी मिळाल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर मोठा वाद झाला होता. अवघ्या तीन दिवसांमध्ये राधे माँची महामंडलेश्वर उपाधी काढून घेण्यात आली होती.
पुढील स्लाइडमध्ये, कोण आहे टल्ली बाबा ?
स्कर्टनंतर जिन्स टॉपमध्ये समोर आली राधे माँ