आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धूला राधे माँ मध्ये दिसतो \'रब\', दिल्लीत केला होता आयटम साँगवर डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेटरचा नेता, समालोचक झालेला नवज्योतसिंग सिद्धूला राधे माँमध्ये देवीचे दर्शन होते. सिद्धूचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो राधे माँचे गुणगाण सांगताना थकत नाही. राधे माँ मध्ये 'रब' दिसतो असा दावा सिद्धू करतो. याशिवाय राधे माँचा हिंदी चित्रपट गीतावरील डान्सचा व्हिडिओ टीव्ही चॅनलवर दाखवल्यानंतर दिल्लीतही राधे माँ आयटम साँगवर थिरकल्याची माहिती आहे.

स्वतःला देवीचा अवतार सांगणाऱ्या राधे माँवर मुंबईत झालेल्या आरोपानंतर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तिच्याविरोधात बोरिवलीतील एका महिलेने कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी लवकरच राधे माँला अटक केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. बोरिवलीतील निकी गुप्ता या महिलेने आरोप केला आहे, की राधे माँने तिला मारहाण करत होती. तिच्या सासरच्या मंडळींनी राधे माँच्या सेवेसाठी तिला तिच्या घरी ठेवले होते. राधे माँच्या सांगण्यावरुनच तिच्या सासरच्या लोकांनी आता तिला घराबाहेर काढले आहे.
दुसरीकडे, माजी क्रिकेटर सिद्धूचे नाव राधे माँ वादाशी जोडले गेल्यानंतर स्पष्ट करण्यात आले आहे, की सिद्धू अनेक कार्यक्रमांना हजर असतात. त्यासाठी ते लाखो रुपये घेतात. राधे माँच्या अशाच एका कार्यक्रमात सिद्धूला बोलवाण्यात आले होते, आणि त्यांनी तिथे ते राधे माँमध्ये 'रब' दिसत असल्याचे म्हटले होते.

पुढील स्लाइडमध्ये, दिल्लीतील लाजपतनगरमध्ये आयटम साँगवर थिरकण्याची कथा
बातम्या आणखी आहेत...