आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राडिया टेपवरून वाटते ,की प्रत्येक खात्यात दलाल; न्यायमूर्ती जी.एस. सिंघवींचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांच्या ध्वनिमुद्रित संभाषणांवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारी तपास संस्थांना चांगलेच फटकारले आहे. राडिया यांच्या नेते, उद्योगपती आणि इतर व्यक्तींसोबतच्या दूरध्वनी संवादांत हवाला व्यवहारांसह अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या. प्रत्येक सरकारी विभागात दलालांचा सुळसुळाट असल्याचे संकेत टेपमधील संवादांतून मिळत असल्याचे न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी यांच्या न्यायपीठाने नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या टेपमध्ये अनेक गंभीर मुद्दे होते. मात्र त्याकडे कानाडोळा करत तपास यंत्रणांनी फक्त टूजी घोटाळ्याशी संबधित मुद्दय़ांवरच लक्ष केंद्रित केले. जवळजवळ सर्वच सरकारी खात्यांमध्ये दलालांची उपस्थिती असते. फक्त त्यांच्या संबोधनांत फरक दिसतो. टेप केलेल्या या संवादांच्या गांभीर्याची व्याप्ती मोठी आहे.
या संवादांत विदेशात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेने जनहितार्थ दाखल करून या टेप्स सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.

राडिया यांच्या व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी ही संभाषणे ध्वनिमुद्रित करण्यात आली होती. राडियांनी नऊ वर्षांत 300 कोटींची मालमत्ता जमवल्याप्रकरणी अर्थमंत्र्यांकडे दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीनंतर त्यांचे फोन टॅप करण्यात आले होते.