आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Radia Teap Case Hearing In Camera In Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राडिया टेपप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात इन कॅमेरा सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया फोन टॅपिंग प्रकरणात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दोन तास इन कॅमेरा सुनावणी झाली. गोपनीय कागदपत्रासंबंधी केंद्र सरकारची काय भूमिका आहे, याची माहिती या सुनावणीतून घेण्यात आली.


न्यायमूर्ती जी. एस. सिंघवी, व्ही. गोपाला गौडा यांच्या पीठासमोर सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुनावणीला सुरुवात झाली. इन कॅमेरा सुनावणीसाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, सीबीआय, आयकर, गृह खात्याच्या अधिका-यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. पत्रकारांना मात्र सुनावणीला हजर राहण्याची परवानगी नव्हती. सुनावणी 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालली. या खटल्याची पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरला होणार आहे.


दुर्मिळ सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात एखाद्या प्रकरणात इन कॅमेरा सुनावणी होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. याअगोदर 1996 मध्ये हवाला प्रकरणात अशा प्रकारे बाजू ऐकण्यात आली होती. वास्तविक खालच्या न्यायालयात संवेदनशील प्रकरणात इन कॅमेरा सुनावणीची प्रक्रिया अगदी सामान्य झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात मात्र ही प्रक्रिया दुर्मिळ मानली जाते.