आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किरणोत्सारी पदार्थाची गळती, दिल्ली विमानतळावर भीतीचे वातावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी तुर्कीहून आलेल्या एका कंटेनरमध्ये ठेवलेल्या आण्विक औषधीद्वारे झालेल्या किरणोत्सारी पदार्थाची गळती झाल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे कार्गो विमानांची वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनाही तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने तेथे जाऊन कथित गळती बंद केली. गळती बंद करण्यात आली, असा दावा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काही वेळात केला. मात्र ही किरणोत्सारी गळती नव्हतीच, असे अणुऊर्जा नियामक मंडळाने (एआयआरबी) नंतर स्पष्ट केले.
मंडळाने संध्याकाळी सांगितले की, तुर्की एअरलाइन्सने आलेल्या कार्गोतून दुसऱ्या कन्साइनमेंटद्वारे आलेला सेंद्रिय द्रवपदार्थ सांडला होता. त्यात कुठलाही किरणोत्सारी पदार्थ नव्हता. त्यापूर्वी विमानतळावरील कार्गो टर्मिनलच्या लोकांनी डोळ्यांची जळजळ होत असल्याची तसेच डोळ्यांतून अश्रू येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरणोत्सारी पदार्थाच्या गळतीमुळे हा प्रकार होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांत घबराट उडाली. विमानतळ पूर्णपणे रिकामे करून घेण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कर्मचारी आणि प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

रुग्णालयासाठी औषध
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरमध्ये तुर्कीहून दहा पॅकेट्स आले होते. त्यापैकी चार पॅकेट्समध्ये आण्विक पदार्थापासून बनवलेली (सोडिअम आयोडाइड १३१) औषधी होती. ही औषधी एका मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने मागवली होती. एआयआरबीचे उपाध्यक्ष आर. भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडियण आयोडाइड हे औषध मागवण्यासाठी परवानगी आहे. ते देशातही तयार केले जाते आणि १२० केंद्रांवर पाठवले जाते.
बातम्या आणखी आहेत...