आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल विमान सौदा : मे अखेरीस स्वाक्षरी होणार, भारतात २२६ अब्जांची गुंतवणूक येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि फ्रान्समधील बहुउद्देशीय राफेल लढाऊ विमान खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दोन्ही देशांनी या कराराच्या अनुषंगाने आपसातील मतभेद बऱ्याच प्रमाणात कमी केले आहेत. त्यामुळे फ्रान्सचे एक पथक पुढील महिन्यात भारतात येणार आहे. तसेच पुढील महिन्यातच याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे. या करारानुसार भारताला पहिल्या तीन वर्षांत ३६ विमाने मिळणार आहेत.

सरकारी सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांचे फोनवर यासंदर्भात बोलणे झाले असून त्यानंतर फ्रान्सने ५० टक्के ऑफसेटवर काम करण्यास तयारी दर्शवली आहे. या करारामुळे भारतात जवळपास तीन दशलक्ष युरोची (२२६ अब्ज रुपये) गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून त्याला लवकरच मूर्त रूप दिले जाईल. तसेच मे अखेरीस पहिल्या करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात.
राफेल लढाऊ विमान खरेदीबाबत भारत-फ्रान्सदरम्यान अनेक वर्षांपासून बोलणी सुरू आहेत. दोन्ही देशांदरम्यान या कराराच्या किमतीवर प्रदीर्घ काळापासून घासाघीस सुरू आहेत. परंतु ठोस िनर्णय होत नव्हता. यूपीए सरकारच्या कार्यकाळात त्याचे टेंडर काढण्यात आले होते. परंतु नंतर डॉलरचे दर वाढल्याने त्यात फ्रान्सकडून वाढ करण्यात आली, तर भारताने विमानांच्या किमतीत व एकूण करारात कपात करण्यासाठी फ्रान्सकडे आग्रह धरला होता. मात्र, फ्रान्स किमती कायम ठेवण्याबाबत ठाम होता.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या कराराच्या विलंबाबावर प्रश्न उपस्थित करताना किमतींबाबत तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी चार महिन्यांपूर्वी या विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तसेच ओलांद यांच्या दौऱ्यात जानेवारी दौऱ्यातही त्यावर चर्चा झाली होती.
बातम्या आणखी आहेत...