आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठी फूडपार्क: राहुल गांधी म्हणाले - पंतप्रधान सुडाचे राजकारण करु लागले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. अमेठीतील फूड पार्क रद्द करण्याच्या मुद्यावर गुरुवारी लोकसभेत राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान विकासाचे नाही तर सुडाचे राजकारण करत आहेत.' त्यांनी असे म्हणताच सत्ताधारी बाकांवरुन आराडाओरड सुरु झाली. तेव्हा राहुल गांधींनी सत्ताधारी सदस्यांना चिमटा काढत म्हणाले, मी बटाट्यांबद्दल बोलत आहे, 'सुट'वर नाही. राहुल गांधींच्या आरोपांना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तर दिले. त्यांनी सुडाच्या राजकारणाचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, या प्रकरणाची मी आधी सविस्तर माहिती घेतो आणि मग संसदेत उत्तर देईल.
अमेठीमध्ये नियोजित फूडपार्क योजना रद्द करण्याचा मुद्या गुरुवारी राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, 'लोकसभा निवडणूक काळात मोदी अमेठीत आले होते. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, की आम्ही सुडाचे नाही तर विकासाचे राजकारण करु. मात्र ते त्यांचे आश्वासन विसरले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याची फूडपार्क योजना रद्द केली आहे. हे सुडाचे नाही तर कोणते राजकारण आहे ?' माझी मागणी आहे की ही योजना रद्द करु नये. या योजनेचा अमेठीसह 10-12 जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे.
राजनाथसिंह म्हणाले, अमेठी येथील फूडपार्कला 2010 मध्ये मंजूरी मिळाली होती. या सरकारने ते रद्द केलेले नाही. दुसरे असे, की सरकार सर्वांच्या सहकार्यानेच चालते आम्ही सुडाचे राजकारण करत नाही. शेतकऱ्यांचे हित आम्हाला चांगले ठाऊक आहे. अमेठी येथील फुडपार्क जुलै 2014 मध्ये मोदी सरकारने त्याला रद्द केले. त्याला जमीन न मिळाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने हे कारण फेटाळून लावेल आहे.
पुढील स्लाइडवर, राहुल गांधींनी सुरु केले ट्विटर अकाऊंट