आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने रि-ट्वीट केले राहुल गांधींचे अकिडो प्रॅक्टीसचे फोटो, मिळवला आहे ब्लॅक बेल्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकिडोच्या प्रॅक्टीस सेशन दरम्यान इन्स्ट्रक्टर सेन्सेई पारितोस यांच्यासह राहुल गांधी. - Divya Marathi
अकिडोच्या प्रॅक्टीस सेशन दरम्यान इन्स्ट्रक्टर सेन्सेई पारितोस यांच्यासह राहुल गांधी.
नवी दिल्ली - राहुल गांधी (47) यांनी नुकतेच एका कार्यक्रमात म्हटले होते की, ते जपानचे मार्शल आर्ट 'अकिडो'मध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. आता काँग्रसेन त्यांच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवर फोटो जारी करत राहुल यांचे म्हणणे खरे असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसने मंगळवारी एका ट्विटर पोस्टला रिट्वीट केले. त्यात राहुल अकिडोची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. फोटोमध्ये राहुल गांधींचे इन्स्ट्रक्टरही त्यांच्याबरोबर दिसत आहेत. 

बॉक्सर विजेंदरला दिलेले वचन पाळले.. 
- राहुल यांच्या या फोटोवरून स्पष्ट होते की, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंहशी केलेले आश्वासन त्यांनी पाळले आहे. विजेंदर यांनी राहुल यांना त्यांचे लग्न आणि खेळाबाबत प्रश्न केला होता. त्यावर राहुल यांनी सांगितले होते की, ते रोज एक तास अकिडोची प्रॅक्टीस करतात. खेळाशी संलग्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 
- या प्रश्नावर विजेंदरने त्यांना म्हटले होते की, लोकांना त्यांची ही बाजू माहिती नाही. त्यामुळे ते काही फोटो पोस्ट करून, लोकांना त्यांच्या या कौशल्याबाबत सांगू शकतात. काँग्रेसने केलेले हे ट्वीट राहुल यांनी विजेंदरला दिलेले उत्तर असल्याचे समजले जात आहे. 

काय आहे अकिडो..?
- अकिडो जपानचे एक मार्शल आर्ट आहे. त्यात कोणत्याही शस्त्राचा वापर केला जात नाही. 
- भराड नावाच्या एखा व्यक्तीने राहुल गांधींचे हे फोटो पोस्ट केले होते. त्यांना टॅग करत काँग्रेसने ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवर ते रिट्वीट केले आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...