आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांनी सुषमांना म्हटले ड्रामेबाज, राहुल गांधींनी विचारले- मोदीने किती पैसे दिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर शुक्रवारी जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी सुषमा स्वराज यांना ड्रामेबाज म्हटले आहे. तर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ललित मोदीला केलेल्या मदतीच्या बदल्यात सुषमा स्वराजांना किती पैसे मिळाले, असा सवाल केला आहे. दोन्ही बाजूंनी वक्तव्यांच्या फैरी झडायला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मणुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींनी मोर्चा सांभाळला. त्या म्हणाल्या, राहुल गांधी त्यांच्या काँग्रेसला हेच संस्कार देणार आहेत का? सोनियाजींना दीड मिनीटांचा बाइट देणे सोपे आहे, मात्र कागद हातात न घेता दीड तास भाषण देणे अवघड आहे.
काँग्रेसच्या 25 खासदारांचे पाच दिवसांसाठी निलंबन केल्यापासून काँग्रेसने कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. ललितगेट प्रकरणी सुषमा स्वारजांसह राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला होता. त्यामुळे लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजनांनी 25 खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले. शुक्रवारी देखील काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात धरणे आंदोलन सुरु होते.
सुषमा स्वराज यांच्यावर थेट निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, ललित मोदीच्या मदतीसाठी सुषमा स्वराज यांना किती पैसे मिळाले, हे देखील त्यांनी देशाला सांगावे. त्यांचे पती आणि मुलीच्या खात्यात किती पैसे आले याचे त्यांनी देशाला उत्तर द्यावे.

स्वराज यांनी ललित मोदीला मदत कल्याचे नाकारत गुरुवारी सभागृहात भावनात्मक भाषण केले. त्यावरुन राहुल गांधी म्हणाले, चोर कधी कबूल करतो का मी चोरी केली आहे. सुषमा स्वराज यांनी लपून-छपून काम केले होते. मोदीला मदत करत आहे, हे त्यांनी सरकारच्या निदर्शनास का आणले नाही. त्यांनी सांगवे की, ललित मोदीने तुरुंगाबाहेर राहाण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना किती पैसे दिले ?

गुरुवारी लोकसभेत काय म्हणाल्या सुषमा स्वराज
सुषमा म्हणाल्या, ललित मोदींना प्रवास परवानगीची कागदपत्रे देण्यास मी शिफारस केली नाही. ब्रिटिश सरकारला केवळ तोंडी निरोप देत निर्णय त्यांच्यावरच सोडला. अशी मदत करणे गुन्हा असेल तर होय, मी गुन्हा केलाय. त्यासाठी सभागृह देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे. पुढे त्या म्हणाल्या, मोदींची पत्नी 17 वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त आहे. दहाव्यांदा त्यांचा कर्करोग उमळून आला आहे. पोर्तुगालमध्ये त्यांच्यावर उपचार करायचे होते. प्रसंगी त्यांचा मृत्यूही झाला असता. माझ्या ठिकाणी तुम्हीही असत्या तर काय केले असत, असा सवाल त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केला.
बातम्या आणखी आहेत...