आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi And Congress Members Wearing Black Armbands In The Lok Sabha

काळ्याफिती लावून काँग्रेस सदस्य संसदेत, अध्यक्षांचा कारवाईचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललितगेटवरुन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस खासदारांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभा सभागृहात काळीफित लावून प्रवेश केला. यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सर्वात पुढे होते. खासदारांनी 'मोदी मेहरबान, तो छोटा पहलवान', 'मोदी चुप्पी तोडो' लिहिलेले फलक सोबत घेतले होते. यावर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आक्षेप घेतला आणि सदस्यांचे असे वागणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. महाजन यांनी काँग्रेस सदस्यांना काळ्याफिती काढण्यास सांगितले अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला.
लोकसभाध्यक्षा महाजन यांनी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव आज रद्द केला. माजी आयपीएल आयुक्त ललित मोदीला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेली मदत आणि त्यांच्यातील संबंधावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी दुसऱ्या दिवशीही लावून धरली. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा स्थगित करण्यात आले.