नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त वीरभूमीवर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रियंका वढेरा यांची कन्या मिराया वढेरा आणि तिचे मामा अर्थात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांचे हात पाहात होते. असे वाटत होते, की ते एकमेकांना विचारत आहेत सांग कोण गोरे...
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमीत्तर वीरभूमीवर कार्यक्रम
गुरुवारी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांची 71 वी जयंती देशात साजरी झाली. दिल्लीतील वीरभूमी येथे जयंतीनिमीत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह उपराष्ट्रपती हामिद अंसारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीव गांधींची समाधी वीरभूमी येथे पुष्पांजली अर्पण केली.
गांधी कुटुंबातील राहुल गांधी, राजीव-सोनियांची कन्या प्रियंका वढेरा तिचे पती रॉबर्ट वढेरा यांनीही समाधीस्थळी नमन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन देशाच्या माजी पंतप्रधानांना जयंतीनिमीत्त आदरांजली वाहिली.
वीरभूमी येथे दिवसभर नेत्यांची गर्दी होती. काँग्रेस नेते पी.सी.चाको, सज्जन कुमार, दिल्ली प्रदेस काँग्रेसचे अजय माकन उपस्थित होते. यावेळी भक्तीसंगीताची धून निरंतर वाजत होती. एनएसयूआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये, राष्ट्रपती आणि सोनियांसह अनेकांनी वाहिली आदरांजली