आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gandhi Arvind Kejriwal And Many Politician Join Akshay Singh Funaral At Nigam Bodh Gath Delhi

\'व्यापमं\' घोटाळा : डॉ. अरुण शर्मा यांनी मृत्‍यूपूर्वी दिले STF ला 200 दस्तावेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. अरुण शर्मा - Divya Marathi
डॉ. अरुण शर्मा

नवी दिल्ली- मध्यप्रदेशातील बहुचर्चित मध्यप्रदेशात सध्या गाजत असलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) भरती घोटाळ्याचा पाठपुरावा करणा-या पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आढळून आला. त्‍यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्‍यान, डॉ. शर्मा यांनी मुत्‍यूपूर्वी एसटीएफ लघोटाळयातील महत्‍त्‍वाची 200 कागदपत्रे दिल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

व्यापमं घोटाळ्याचा पाठपुरावा करणारे टीव्ही पत्रकार अक्षय सिंह यांचा शनिवारी संशयास्पद मृत्यू झाला. दिल्लीतील निगम बोध घाटवर अक्षय सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय माकन उपस्थित होते. दुसरीकडे, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अक्षय सिंह यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. दरम्‍यान, या घटनेच्‍या काहीच तासानंतर नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या उप्पल हॉटेलमध्ये रविवारी सकाळी डॉ. अरुण शर्मा यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ एक मद्याची बाटली आढळून आली असून, त्यांनी उलटीदेखील केली आहे. न्यायसहायक पुरावे गोळा करून शर्मा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, असे पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले. महाविद्यालयातील रेडिऑलॉजी विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. शर्मा यांनी गेल्याच महिनाभरापूर्वी डॉ. डी. के. साकळे यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. सकाळे यांचा ४ जुलै २०१४ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. व्यापमं घोटाळ्याचा तपास करणार्‍या समितीचे ते सदस्य होते.

या सर्व प्रकारामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. अक्षय सिंह यांच्या मृत्यूची एसआयटीकडून चौकशी करण्‍यात येणार असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि अाम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.


अक्षय सिंह हे शनिवारी मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये व्यापम घोटाळ्याचे कव्हरेज घेण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. अक्षय यांच्या पाठोपाठ व्यापम घोटाळ्याशी संबंधित मध्य प्रदेशमधील जबलपूर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.अरुण शर्मा यांच्या दिल्लीतील एका हॉटेलमध्ये रविवारी संशयास्पद मृत्यु झाला. त्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, टीव्ही जर्नलिस्ट अक्षय सिंह यांच्या अंत्ययात्रेला पोहोचले राजकीय नेते...