आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभूत विकासासाठी सुधारणांची गरज; शिक्षणव्यवस्था कौशल्याधारित हवी- राहुल गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत देशात खूप ऊर्जा आहे. मात्र ऊर्जेला दिशा देण्याची गरज आहे. देशातील तरुणांना देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे लागेल व त्यासाठी संघर्षाची तयारी हवी, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष व युवकाचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी सीआयआयच्या वार्षिक संमेलनात मार्गदर्शन केले. मला देशाच्या एका मोठ्या सीआयआयसारख्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यास संधी मिळत आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले, आज देशाला विकासाच्या एका टप्प्यावर नेण्याची गरज आहे. त्यात सर्व देशातील लोकांना विकासात सामील करुन घ्यावे लागेल. दलित, महिला, आदिवासी यांच्यापर्यंत विकासाचे फळे पोहचवावी लागतील. पायाभूत सुविधांत सुधारणांची मोठी गरज असून, लोकांना घरे, रस्ते, वीज, बंदरे, धरणे, नद्याजोड प्रकल्प सारख्या पायाभूत सुविधांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. देशात आज बेरोजगारीचा प्रश्न आहे पण मला त्यापेक्षा सध्या शिक्षणव्यवस्थेत दिले जात असलेल्या शिक्षणाबाबत प्रश्न आहे. आपण आता शिक्षणव्यवस्था बदलण्याची गरज असून व्यावसाभिमूख व कौशल्याधारित शिक्षणव्यवस्था आणण्याची गरज आहे. सरकार एकटे काही करु शकत नाही, असे सांगत राहुल यांनी देशातील बड्या उद्योगधंद्यातील लोकांनी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मदत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मागील काळात काँग्रेसने देशाला स्थिर व चांगले सरकार दिले. यूपीएने जातियवाद नष्ट करण्यास प्राधान्य दिल्याने विकासाचा समतोल राखला गेला असेही राहुल यांनी सांगितले.