आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला कर्नाटकातील भ्रष्टाचार दिसत नाही, NSUIच्या मेळाव्यात राहुल गांधीचा हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विरोधक कितीही आरोप करीत असले तरी, आपल्याकडे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. मात्र, आपल्या प्रश्नाचे विरोधकांकडे उत्तर नाही. त्यामुळे त्यांच्या हल्ले परतवून लावण्यासाठी काँग्रेसची भूमिका आपल्याला माहित असली पाहिजे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एनएसयूआयच्या कार्यक्रमात म्हणाले.
राहुल गांधी यांनी भाजपचा उल्लेख टाळत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'विरोधक काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. मात्र, त्यांना कर्नाटकातील भ्रष्टाचार दिसत नाही. त्यांच्या मुख्यमंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जावे लागले याचाही त्यांना विसर पडतो. मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यांमधील भ्रष्टाचार भाजपला दिसत नाही. केवळ काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात.'

विद्यार्थ्यांनी काँग्रेसच्या योजनांची जनतेला माहिती दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, 'तुम्ही विद्यार्थी आहात, काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. तुम्ही जनतेला काँग्रेसने भ्रष्टाचाराविरोधात केलेल्या उपाय योजनाची माहिती दिली पाहिजे. महितीचा अधिकार, लोकपाल कायदा ही काँग्रेसची देण आहे. या माध्यमातून भ्रष्टाचार थांबवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.'

जिथे कुठे भ्रष्टाचार होत असल्याचे कळाले तिथे काँग्रेसने कारवाई केल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यात काँग्रेस कमी पडत असल्याचे ते म्हणाले.