आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता राशिद अल्‍वींची मुक्ताफळे, म्‍हणे राहुल गांधीच होतील पंतप्रधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फक्त राहुल गांधीच पंतप्रधान होतील, याचा आम्हाला विश्वास आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते राशिद अल्वी यांनी मंगळवारी म्हटले आहे. तत्पूर्वी, राहुल यांनी याबाबत कधीही इन्कार केला नसल्याचे पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी म्हटले होते. त्‍यांच्‍या वक्तव्‍यावरुन कॉंग्रेसच्‍या काही नेत्‍यांनी नाराजी व्‍यक्त केली होती.

राहुल यांनी पंतप्रधान व्हावे अशी पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे. हे पद सांभाळण्याची त्यांच्यात पुरेपूर क्षमता आहे. त्यांचे विचार दूरदर्शी आहेत. ते पंतप्रधान होतील, याचा पुरेपूर विश्वास आहे. तेच देशाला पुढे नेतील, असे अल्वी म्हणाले. जनतेची इच्छा असेल, तर त्यांनी हे पद का घेऊ नये, असा सवाल दिग्विजयसिंह यांनी केला.