आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी राहूनच शिकत होते राहुल गांधी, जाणून घ्या किती शिकलेले आहे काँग्रेस उपाध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांना सुरक्षेच्या कारणामुळे बराचकाळ घरातच शिक्षण घ्यावे लागले. - Divya Marathi
राहुल गांधी यांना सुरक्षेच्या कारणामुळे बराचकाळ घरातच शिक्षण घ्यावे लागले.
नवी दिल्ली - काँग्रेसचे भावी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यांचाकडे काँग्रेसजन आदराने पाहातात ते पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा येत्या रविवारी जन्मदिवस आहे. राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 मध्ये दिल्लीत झाला. देशातील सर्वात मोठ्या राजकीय घरात जन्मलेले, माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे चिरंजीव राहुल हे दोघा भावा-बहिणीत ज्येष्ठ आहेत.

का घरात राहून झाले राहुल गांधींचे शिक्षण
>> राहुल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये झाले.
>> त्यानंतर पुढील शिक्षणासाठी राहुल गांधी यांना डेहरादून येथील दून स्कूलमध्ये पाठवण्यात आले.
>> 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीनंतर सुरक्षेच्या कारणामुळे राहुल यांना घरात राहूनच शिकावे लागले.
>> राहुल गांधी यांचे वडील, देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचे शिक्षणही दून स्कूलमध्ये झाले होते.
>> अजूनही गांधी फॅमिलीतील मुले दून स्कूलमध्ये शिक्षण घेतात. राहुल गांधी यांचे भाचे आणि प्रियंका यांचा मुलगा रेहान वढेरा दून स्कूलमध्ये आहे. तर, मुलगी मिराया वेलहम गर्ल्स स्कूलमध्ये शिकत आहे.

काय वैशिष्ट्य आहे दून स्कूलचे
>> दून स्कूलला एज्यूकेशन वर्ल्ड मॅगझीनकडून जगातील सर्वोत्तम बोर्डिंग स्कूलमध्ये स्थान देण्यात आले आहे.
>> दून स्कूलची स्थापना सतीश संजन दास यांनी केली होती. ते स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास आणि भारताचे माजी मुख्य न्यायाधीश सुधि संजन दास यांचे बंधू होते.
>> भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी म्हणजे 1935 मध्ये दून स्कूलने रविंद्रनाथ टागोर लिखित 'जण गण मन' हे शाळेचे गीत म्हणून निवडले होते. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते राष्ट्रगीत म्हणून स्विकारले गेले.
>> वेलहम स्कूल देखील नामांकित शाळा आहे. आयसीएसईच्या सर्वेक्षणात सर्वाधिक चांगला निकाल देणाऱ्या शाळांच्या यादीत या शाळेचा अव्वल क्रमांक आहे.
>> सीपीएम नेत्या वृंदा करात, अभिनेत्री करीना कपूर, दिग्दर्शिका दीपा मेहता यांसारख्या दिग्गजांनी येथेच शिक्षण घेतले होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, किती झाले आहे राहुल गांधींचे शिक्षण