आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकिडोत ब्लॅक बेल्ट प्राप्त राहुल गांधी यांचे फाेटाे अाठवडाभराने अाले समाेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एकिडो हा मार्शल आर्टचा प्रकार करतानाचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे चार फोटो समोर आले आहेत. यात ते प्रशिक्षक सेनसी परीतोस कर यांच्यासोबत सराव करत आहेत. या फोटोंना काँग्रेसने रिट्विट केले आहे. एकिडो हा जपानी मार्शल आर्टमधील एक प्रकार आहे. गेल्या आठवड्यात २६ ऑक्टोबरला एका कार्यक्रमात ऑलिम्पिक कांस्यविजेता विजेंदरसिंहने विचारले होते की, नेतेमंडळी क्रीडाप्रकारांत स्वारस्य का घेत नाहीत? त्यावर राहुल म्हणाले होते, क्रीडा प्रकार माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. मी व्यायाम करताे, रनिंग, स्विमिंग करतो. एकिडोमध्ये मला ब्लॅक बेल्ट मिळालेला आहे. मात्र, सार्वजनिकपणे मी यावर बोलत नाही.
बातम्या आणखी आहेत...