आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणुकीच्या आधीच राहुल गांधींच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ?, उदया महत्त्वाची बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गळ्यात लवकरच पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजूरी देण्यासाठी सोमवारी ( 20 नोव्हेंबर) काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावली गेली आहे. ही बैठक सोमवारी सकाळी 10.30 वाजता पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल यांचा एकट्याच अर्ज येणार आहे. तसेच गुजरात निवडणुकीच्या आधीच राहुल यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपद सोपवलेले असेल.  9 डिसेंबरपूर्वीच राहुल अध्यक्षपदी...

 

 

- सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी 9 डिसेंबरपूर्वीच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेऊ शकतात.
- काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. पण राहुल गांधी शिवाय कोणीच अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला नसल्यामुळे आता राहुल यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड होणे केवळ औपचारिकता राहिली आहे.
- निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला 31 डिसेंबरपूर्वी काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
- मात्र, गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच राहुल यांच्याकडे ही जबाबदारी दिले जाऊ शकते.
- गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात 182 जागांसाठी मतदान होत आहे.
-  तर 18 डिसेंबर रोजी गुजरात आणि हिमाचल राज्याचे निकाल हाती येतील.

बातम्या आणखी आहेत...