आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Challenges PM Modi To Prove Allegations

..तर 6 महिन्यांत चौकशी करून मला अटक करा, राहुल गांधींचे मोदींना चॅलेंज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज दिले आहे. मोदी सरकारने त्यांच्यावर आरोप लावण्याऐवजी 6 महिन्यांत चौकशी करावी आणि त्यात काही आढळल्यास आपल्याला अटक करावी असे राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधींनी इंदिरा गांधीच्या 98 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित यूथ काँग्रेसच्या एका कार्यक्रमात मोदींना हे आव्हान दिले. यादरम्यान राहुल गांधींनी आरएसएसची तुलना बंदी असलेली मुस्लीम संघटना सिमीबरोबर केली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींकडे ब्रिटीश पासपोर्ट असल्याचे म्हटले होते.

कुटुंबावर धूळफेक योग्य नाही
राहुल गांधी म्हणाले, मोदीजी तुमचे सरकार आहे. तुमच्याकडे तपाससंस्था आहे. माझ्या विरोधात तपास करा आणि काही आढळले तर 6 महिन्यांत अटक करा. पण रोज माझ्या कुटुंबावर असे आरोप करणे योग्य नाही. ते म्हणाले, मी मोदींना जराही घाबरत नाही. ते आरोप करून मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी शेतकऱ्यांसाठी आणि देशासाठी झगडत राहणार आहे.

बदल आकड्यांनी नाही विचारांनी घडतो
राहुल गांधी म्हणाले, मोदी आणि त्यांच्या पक्षातील नेते वारंवार म्हणतात की, काँग्रेसकडे केवळ 44 खासदार आहेत. पण खासदारांच्या आकड्याने नव्हे तर विचारांनी बदल घडतो. आम्ही नेहमी गरीब, शेतकरी आणि मजुरांच्या हक्काच्या लढाईचा विचार करत असतो.

वरिष्ठ नेत्यांचे कौतुक
कार्यक्रमादरम्यान बिहार निवडणुकीतील विजयाचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, त्याठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि सीपी जोशी काम करत होते. त्यांना निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे. यूथ काँग्रेसने निवडणुकीत उत्साहाने काम केले. हाच अनुभव आणि उत्साह मला एकत्र आणायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.