आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Conducts Training And Examination Of Spokespersons Of Congress

राहुल गांधींच्‍या परीक्षेत 270 पैकी केवळ 25 प्रवक्तेच पास!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी आगामी निवडणुकांसाठी जंगी तयारी सुरु केली आहे. परंतु, त्‍यांच्‍या तयारीमध्‍ये बडबोल्‍या प्रवक्त्यांचे काही खरे दिसत नाही. राहुल गांधी यांनी नुकतेच प्रवक्तापदासाठी एक पात्रता परीक्षा घेतली होती. देशभरातून 270 जणांचा या परीक्षेत समावेश होता. मात्र, केवळ 25 जण राहुल गांधींच्‍या परीक्षेत पास झाले आहेत.

प्राप्‍त माहितीनुसार, 14 ते 19 सप्‍टेंबर या कालावधीत प्रशिक्षण आणि पात्रता परीक्षा घेण्‍यात आली होती. त्‍यात सध्‍या प्रवक्ते असलेल्‍यांचा समावेश होता. परीक्षा लेखी आणि तोंडी होती. लेखी परीक्षेसाठी 250 शब्‍दांमध्‍ये सध्‍याचे मुद्दे, राजकीय घडामोडी, सरकारचे कार्य, दहशतवाद, दहशतवादावर सरकारचे धोरण, महागाई, भ्रष्‍टाचार इत्‍यादी विषयायंवर मत मांडायचे होते. प्रत्‍येकाला कोणत्‍याही दोन विषय निवडण्‍याचे स्‍वातंत्र्य होते. त्‍यानंतर या विषयांवर पक्षाचे आणि स्‍वतःचे मत तोंडी स्‍वरुपात केवळ 3 मिनिटांमध्‍ये मांडायचे होते. तसेच 12 जणांचे गट तयार करण्‍यात आले होते. त्‍यात या विषयांवर चर्चाही करायची होती. या संपूर्ण प्रक्रीयेचे रेकॉर्डींगही करण्‍यात आले. त्‍यानंतर केवळ 25 जण या परीक्षेत पास झाले.

काँग्रेस सचिवांना केआरए... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...