आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Congress Narendra Modi Bjp General Election 2014 Latest News In Marathi

काँग्रेसी नेत्यांना पराभवाची भीती? राहुल म्हणाले, आताच हार मानण्याची गरज नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसच्या अनेक युवा खासदार व नेत्यांनी राहुल यांच्याकडे तक्रार केली आहे की, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याची खूणगाठ आताच मनाशी बांधली आहे. युवा खासदारांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे गुरुवारी ही बाब स्पष्ट केली. त्यावर राहुल यांनी युवा खासदारांना, आमदारांना व पक्षातील नेत्यांना सांगितले की, निवडणुकाआधीच पराभव पत्करण्याची गरज नाही.
राहुल शुक्रवारी (आज) काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यांना अनौपचारित्या भेटणार आहेत. त्यावेळी ते वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करतील. त्यावेळी ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा अजेंडाही ठेवतील. वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या अनुभवाशी निगडीत सूचना करण्यास सांगण्यात येणार असल्याचेही राहुल यांनी सांगितले.
गुरुवारी राहुल यांनी पक्षातील युवा खासदार, आमदारांसह नेत्यांशी संवाद साधला. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या. आपले सरकार 10 वर्षे सत्तेत आहे. या काळात अनेक चांगल्या बाबी देशात घडल्या आहेत. देशातील जनतेला सांगण्यासारखे खूप काही आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणतेही तडजोड केली जात नसल्याचा संदेश जनतेत गेला पाहिजे. भ्रष्टाचारविरोधी विधेयक प्रलंबित राहण्यामागे विरोधक कसे अडथळे आणत आहेत हे जनतेला सांगा. विरोधी पक्षांच्या खोट्या प्रचाराला आक्रमकपणे उत्तर दिले पाहिजे.
गुरुवारी झालेल्या या बैठकीत पक्षातील सुमारे 45 युवा नेते सहभागी झाले आहेत. यात काही युवा नेत्यांनी तक्रारी केल्या की, पक्षातील जुनेजाणते आताच निवडणूका हरलो आहोत, असे समजून चालले आहेत. यावर राहुल म्हणाले, असे अजिबात नाही. आपण पूर्ण ताकदीने निवडणुका लढवायच्या आहेत.