आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल यांची 5 डिसेंबरला पक्षाध्यक्षपदी निवड शक्य; दशकभराच्या चर्चेनंतर नेतृत्व सोपवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दशकभरापासून सुरू असलेल्या चर्चांना विराम देत काँग्रेसने राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची तारीख निश्चित केली आहे. गुजरातेत मतदानाआधी ५ डिसेंबरला ४७ वर्षीय राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे.


काँग्रेस कार्यसमितीने सोमवारी अध्यक्षपद  निवडणुकीच्या कार्यक्रमास मंजुरी दिली. १ ते ४ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज, ५ तारखेला पडताळणी होईल. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास १६ला मतदान व १९ ला मतमोजणी होईल. मात्र राहुलविरोधात कुणीही उभे राहणार नसल्याने ५ डिसेंबरला त्यांची बिनविरोध निवड होईल. गुजरातेत ९ व १४ डिसेंबरला मतदान अाहे.


सोनियांकडे मुख्य संरक्षकपद
काँग्रेस व यूपीएच्या घटक पक्षांना एका सूत्रात बांधण्यात सोनिया गांधी भूमिका महत्त्वाची राहिली आहे. यामुळे राहुल अध्यक्ष बनल्यानंतरही सोनिया या पक्षाच्या मुख्य संरक्षकाच्या भूमिकेत राहू शकतात. 

 

गांधी-नेहरू घराण्यातील सहाव्या व्यक्तीकडे पद 
अध्यक्षपदी निवड झाल्यास हे पद सांभाळणारे राहुल हे गांधी-नेहरू घराण्यातील सहावे व्यक्ती असतील. ते आई सोनिया गांधी यांची जागा घेतील. १३२ वर्षांच्या काँग्रेसमध्ये सोनिया या सर्वाधिक १९ वर्षे अध्यक्ष राहिलेल्या आहेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये ७ वर्षांनी निवडणूक होत आहे.

 

राहुल २०१३ पासून उपाध्यक्ष, २७ निवडणुकांत पराभव 

- १३२ वर्षांत गांधी-नेहरू घराण्याकडे ४० वर्षे अध्यक्षपद राहिले. मोतीलाल यांच्यापासून राजीव गांधींपर्यंत २५ वर्षे अध्यक्षपद घराण्याकडे होते. सोनियांकडे १९ वर्षांपासून अध्यक्षपद.

- परिवारात जवाहरलाल नेहरू सर्वात कमी ४० व्या वर्षी तर सोनिया गांधी सर्वाधिक ५२ व्या वर्षी अध्यक्ष बनल्या.
- राहुल जानेवारी २०१३ मध्ये उपाध्यक्ष बनले होते. तेव्हापासून काँग्रेसने २७ निवडणुकांत पराभव पाहिलेला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...