आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मोदी सरकार सुटा-बुटातील दरोडेखोर- राहुल गांधींचा घणाघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकार गोरगरिब शेतक-यांच्या जमिनी हिसकावून घेऊन उद्योगपतींच्या घशात घालत आहे असे सांगत 'सबसे बडे चोर रात को नही, दिन मे सूट-बुट पहनकर आते हैं' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, शेतक-यांवर अन्याय होऊ नये म्हणून आमच्या यूपीए सरकारने 2 दोन वर्षे काम केले. जयराम रमेश यांनी देशातील तमाम लोकांशी, तज्ज्ञांशी, शेतक-यांशी, विरोधकांशी बोलून सर्वसहमतीने विधेयक आणले. मात्र, मोदी सरकारने काही दिवसातच या विधेयकाची हत्या केली. या सरकारने या विधेयकाची केवळ हत्याच केली नाही तर कु-हाडीने तुकडे तुकडे केले. शेतक-यांना न विचारता त्यांची जमिन काढून घेण्याचा मुद्दा टाकून सरकारने शेतक-यांच्या मानेवर कु-हाडीचा पहिला घाव घातला. त्यानंतर सामाजिक सुरक्षितता, जमिनीचा मोबादला यात फेरबदल केले.
5 वर्षात संबंधित जागेवर प्रकल्प सुरु झाला नाही तर आमच्या सरकारने आणलेल्या विधेयकात ती जमिन परत शेतक-यांना मिळणार होती. मात्र, मोदी सरकारने त्यात बदल करून शेतक-यांवर दुसरा घाव घातला आहे. यातून सरकारला जमिनी हिसकावून घ्यायच्या आहेत हे सिद्ध होते. जमिनीमुळे उद्योग पळून जात आहेत, बंद पडत आहेत हे म्हणणे चुकीचे आहेत. मोदी सरकारच्या अर्थविभागाने दिलेल्या माहितीनुसार 100 पैकी फक्त 8 प्रकल्प जमिनीअभावी प्रलंबित आहेत असे आकडेवारी सांगत आहे.
सरकार बुंदेलखंड, राजस्थानात जमिनी का संपादित करीत नाही. हे सरकार गुडगाव, जयपूर, अहमदाबाद, दिल्लीच्या आसपासच का संपादित करू इच्छित आहे. यामागे कोणते कारण आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारांकडे आजही लाखो हेक्टर जमिन शिल्लक आहे. 'सेझ' धोरणांतर्गत ताब्यात घेतलेल्या एकून 40 टक्के जमिनीही आजही सरकारच्या ताब्यात आहेत मग आणखी जमिन कशाला हवी आहे. आहे त्या जमिनीवर सरकार उद्योग का सुरु करीत नाही? शेतक-यांच्याच जमिनी कशा काय आवडू लागल्या आहेत असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.