आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Criticized Narendra Modi On Land Bill

मोदी सरकारचे भूसंपादन विधेयक उद्योजक धार्जिणे, राहुल गांधी यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी मोदी सरकारवर हल्लाबाेल केला. ५६ दिवसांच्या सुटीनंतर परतलेल्या राहुल यांनी दिल्लीत आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना नव्या भूसंपादन विधेयकावरून केंद्र सरकारला घेरले. मोदी-भाजपने आपले मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यासाठी उद्योजकांकडून हजारो कोटी रुपये कर्ज घेतले. आता यातून उतराई होण्यासाठी शेतक-यांची जमीन त्यांच्या खिशात घालू पाहत असल्याची टीका राहुल यांनी केली.

सुमारे वीस मिनिटांच्या भाषणात राहुल यांनी उत्तर प्रदेशातील भट्टा-परसोलपासून अगदी ऑस्ट्रेलियातील खाण कामगारांपर्यंत सर्वांशी झालेल्या संवादातील किस्से ऐकवले. मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा पर्दाफाश व्हायला हवा, असे सोनिया म्हणाल्या.
फ्रान्स, जर्मनी व कॅनडा या तीन देशांच्या दौ-यांत मोदींनी भारताची बदनामी केल्याचा आरोप राहुल यांनी केला.
यांनी काय केले?
गेल्या ११ महिन्यांत केंद्राने काय कामे केली? फक्त आश्वासने सुरू आहेत. शेतक-यांचे उत्पादन खरेदी न करता दुसरीकडे गहू खरेदीसाठी परदेशांशी करार होत आहेत, अशी टीका सोनियांनी केली.
परदेशात भारतीयांचा अपमान
गेल्या ५० वर्षांपासून या देशात साचलेला कचरा आपण काढत असल्याचे मोदींनी परदेश दौ-यात सांगितले. पूर्वीच्या सरकारबद्दल मोदींच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. जनशक्ती आणि शेतक-यांचे कष्ट याचा मोदींना अंदाजच आलेला नाही, असे राहुल म्हणाले.