आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान, या महिना अखेरीस पूर्ण होणार प्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली - राहुल गांधी या महिन्याच्या अखेरीस काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून 30 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. शक्यता आहे की त्यानंतर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होतील. सोनिया गाधींनी गेल्या आठवड्यातच याचे संकेत दिले होते. 
 
निवडणूक कार्यक्रम सोनिया गांधींकडे 
- काँग्रेसचे केंद्रीय निवडणुक कार्यक्रम अध्यक्ष मुलापली रामचंद्रन यांनी नुकतीच सोनिया गांधींची भेट घेतली होती. यावेळी रामचंद्रन यांनी सोनिया गांधींकडे निवडणुक कार्यक्रम दिला असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमानुसार, पक्षाध्यक्षाची निवड 30 ऑक्टोबरला होणार आहे. 
- अनेक राज्यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या राज्यांच्या कार्यकारिणीने काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी विराजमान होण्याची मागणी केली आहे.
 
राज्य कमिटीकडून मागणी
गेल्या आठवड्यात शुक्रवारी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाविषयी सोनिया गांधींना प्रश्न विचारण्यात आला  होता. त्यावर सोनियांनी लवकरच ते अध्यक्षपदी विराजमान होतील असे सूचक वक्तव्य केले होते. 
- राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय तसा काँग्रेस वर्किंग कमिटीचा असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणारी हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक राहुल यांच्या नेतृत्वात होईल, असेही सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. 
- उत्तराखंड, ओडिशा, महाराष्ट्र, गोवा, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांच्या काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...