आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi In America; Photo Tweet Council; BJP Reply

राहुल गांधी अमेरिकेतच; परिषदेचे छायाचित्र ट्विट; भाजपला प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशातून गायब असल्याबद्दल भाजपकडून उडवल्या जाणाऱ्या खिल्लीवर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरून फोटो पोस्ट झाले आहेत. त्यात ते अमेरिकेतील एस्पेन परिषदेत भाग घेताना दिसत आहेत.
राहुल यांच्या ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे की, एस्पेन परिषदेत वैश्विक अर्थव्यवस्था व तंत्रज्ञानाला हानी पोहोचवणाऱ्या ताकदींवर चर्चा झाली. राहुल गांधी हे ‘वीकेंड विथ चार्ली रोझ’ परिषदेत भाग घेण्यासाठी एस्पेन संस्थेत गेल्याचे काँग्रेस सुरुवातीपासून सांगत आहे. त्यात अर्थ, माध्यमे, राजकारण, तंत्रज्ञान, वैद्यक, क्रीडा व अनेक क्षेत्रांतील दिग्गज सहभागी होतात. भाजपने म्हटले होते की, ‘वीकेंड विथ चार्ली रोझ’ परिषद २५ जून ते ४ जुलैदरम्यानच पार पडली होती. त्यामुळे या परिषदेला राहुल गांधी उपस्थित राहिल्याचे वृत्त दिशाभूल करणारे आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपले, राहुल यांचे फोटो ट्विट केले आहेत. पैकी एकात दोन्ही नेते आइसलँडचे राष्ट्रपती ओलाफर रॅगनर ग्रिमसन यांच्यासोबत, तर दुसऱ्यात ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव डेव्हिड मिलिबँडसोबत आंतरराष्ट्रीय घडामाेडी चर्चासत्रात भाग घेत असल्याचे दिसते.