आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगातील उमेदवारासाठी राहुल गांधींची प्रचारसभा, \'ते काँग्रेसचे विचार नाही\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारनपूर - सहारनपूर येथील काँग्रेस उमेदवार इम्रान मसूद यांना मोदींविरोधातील आक्षेपार्ह्य भाषणाबद्दल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील जाहीर सभेला उपस्थित राहिले, आणि त्यांनी मसूद यांचा प्रचार केला आहे. मसूद यांच्या वक्तव्याशी काँग्रेसचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इम्रान मसूद यांचे वादग्रस्त वक्तव्य सहा महिन्यांपूर्वीचे असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले, 'ते त्यांचे वैयक्तीक मत आहे. त्याच्याशी काँग्रेसचा संबंध नाही. ती काँग्रेसची विचारधारा नाही. मसूद यांनी सहा महिन्यांपूर्वी ते वक्तव्य केले होते. तेव्हा ते समाजवादी पक्षात होते.'
राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाचा फुगा फुटणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी मंचावर मसूद यांच्या पत्नी आणि मुली उपस्थित होत्या. राहुल गांधी म्हणाले, 'गरीबी कमी करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. इंदिरा गांधींनी गरीबी हटावचा सर्वप्रथम नारा दिला होता.' भाजपवर टीका करताना ते म्हणाले, 'विरोधक जो विकासाचा दावा करीत आहेत, तो पोकळ आहे. '
शायनिंग इंडियावर प्रश्न उपस्थित करीत जनसमुदायाला उद्देशून ते म्हणाले, 'मित्रांनो तुम्हीच सांगा कुठे आहे, शायनिंग इंडिया.' काँग्रेसच्या योजना सांगताना ते म्हणाले, ' 5 कोटी जनतेला दारिद्रय रेषेच्या वर आणले आहे. जनतेला अन्न सुरक्षेचा अधिकार दिला आहे. माहितीचा अधिकार दिला आहे.' राहुल गांधी म्हणाले, आम्हाला कोट्यवधी जनतेला अधिकार द्यायचे आहेत. आरोग्य योजनेंतर्गत सर्वांना मोफत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.'
राहुल गांधी यांच्याआधी मसूद यांच्या पत्नीने सभेला संबोधीत केले. त्या म्हणाल्या, 'माझ्या पतीला फसवले जात आहे.'