आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेतील नरसंहराला मोदीच जबाबदार, सरकारनेच भडकवल्या दंगली - राहुल गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सन 1984 मधील शीखविरोधी दंगलींत काँग्रेसच्या काही नेत्यांचा सहभाग होता, अशी जाहीर कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच दिली आहे.

‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाले, त्यांना या कृत्याबद्दल संबंधितांना शिक्षाही झाली आहे. मात्र या दंगलींची तुलना 2002 च्या गुजरात दंगलींशी होऊ शकत नाही. दोन्ही घटनांत मोठा फरक आहे. 2002 मध्ये गुजरात सरकारनेच दंगली भडकवण्याचे काम केले. या उलट 1984 मध्ये काँग्रेस सरकारने दंगली रोखण्याचे काम केले होते. मात्र राहुल यांनी शीखविरोधी दंगलींबद्दल माफी मागण्यास नकार दिला. मी वैयक्तिकरीत्या दंगलीत सहभागी नव्हतो, असे ते म्हणाले.

राहुल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. कोर्टाने मोदींना क्लीनचिट दिली असताना तुम्ही त्यांच्यावर कसे काय आरोप करू शकता, या प्रश्नावर राहुल म्हणाले, 2002 मध्ये गुजरातेतील दंगलींत नरसंहार झाला. मोदी त्या वेळी मुख्यमंत्री होते. मी एकटाच आरोप करतोय, असे नाही. गुजरात सरकारनेच दंगली भडकवल्याचे अनेकांनी पाहिलेले आहे. प्रशासनाने अल्पसंख्याकांवर हल्ले केले आहेत. आगामी निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाला मात देऊ, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी दोन्ही पक्षांच्या विचारधारेमध्ये कमालीचा फरक असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.