आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानपदाच्या जबाबदारीस तयार : राहुल गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मी जनतेचा सेवक आहे, जनतेसाठीच काम करतो, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. पंतप्रधान बनण्याच्या प्रश्नावर राहुल म्हणाले - घटनेत लिहिले आहे की, खासदार पंतप्रधानास निवडतील. सध्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून जे काही होत आहे ते घटनाबाह्य आहे. आमच्या खासदारांनी मला पंतप्रधानपदासाठी निवडले तर जबाबदारीपासून पळणार नाही.

प्रश्न : काँग्रेसला बहुमत मिळेल?
राहुल : बहुमत मिळाले पाहिजे. मात्र आमचा खरा लढा हा विचारसरणीचा आहे. त्यांच्या विचारसरणीत फक्त सत्तेची हाव आहे. एकाच व्यक्तीभोवती सत्ता एकवटावी व त्यानेच मनर्मजीने देश चालवावा. ही वेगळी विचारसरणी आहे.

प्रश्न : सध्या गुजरात मॉडेलचा खूप गवगवा आहे?
राहुल : गुजरात छोट्या उद्योगांवर उभारलेला आहे. अमूलसारख्या सहकारी योजनेवर आधारला होता. आता तुम्ही जर गुजरातचे मॉडेल बघितले तर एका व्यक्तीचा टर्नओव्हर 3 हजार कोटींवरून 40 हजार कोटींवर पोहोचला आहे.

प्रश्न : भ्रष्टाचार रोखण्यात काँग्रेस अपयशी ठरली?
राहुल : भ्रष्टाचार दैत्यापेक्षा कमी संहारक नाही. भ्रष्टाचार भारताची सत्यता आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे असेल तर रोखठोक कारवाई करावी लागेल.

अमेठीतून राहुल तिसर्‍यांदा मैदानात
राहुलची मालमत्ता :
2009 च्या तुलनेत राहुलच्या संपत्तीचे मूल्य दुप्पट झाले. ते 9.4 कोटींचे मालक आहेत. त्यांनी एका मॉलमधील दुकान व हरियाणातील शेतही विकले.

मोदींवर वैयक्तिक हल्ला नाही : मी मोदींवर वैयक्तिक हल्ला केला नाही. त्यांच्या शपथपत्रातील माहितीवर फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित केले. - राहुल

42 किमींचा रोड शो करून उमेदवारी अर्ज दाखल
राहुल गांधी यांनी शनिवारी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. तब्बल 42 किलोमीटरचा रोड शो केला. यावेळी सोनिया गांधी, प्रियंका व रॉबर्ट वढेराही त्यांच्यासोबत होते.

प्रियंकाची राजकीय खेळी
बंधू वरुणबाबत : सुलतानपूरमधून भाजपच्या तिकिटावर लढत असलेले वरुण माझे बंधू आहेत. ते भटकून चुकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत. तुम्ही त्यांना हरवाल तर आम्हाला आनंदच होईल.

नरेंद्र मोदींबाबत : मोदी पंतप्रधान होतील, असे मला वाटत नाही. त्यांची कोणतीही लाट असल्याचे मला दिसत नाही.