आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE STORY: राहुल गांधींचाच होता डाव, कॉंग्रेस श्रेष्ठींना होती कल्पना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलंकित खासदार आणि आमदारांसंबंधीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सरकारने काढलेल्या अध्यादेशाला राहुल गांधी यांचा विरोध आहे, याची कल्पना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काही मोजक्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनाच होती. या आधारावर हे निश्चित होते की, राहुल या अध्यादेशाला विरोध करणार. मात्र, प्रेस क्लबमध्ये ज्या कठोर शब्दांचा त्यांनी वापर केला त्यामुळे काँग्रेस नेते चकीत झाले आहेत. राहुल यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्षांची चर्चा देखील झाली आहे. पक्षातील उच्चस्तरीय सुत्रांच्या माहितीनुसार हे देखील स्पष्ट आहे की, अध्यादेश परत घेण्याआधी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांची चर्चा होणार आहे. कारण, अध्यादेशावर आतापर्यंत सोनियांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. अध्यादेशावर सर्वप्रथम पक्षाच्या कोरग्रुपमध्ये चर्चा झाली त्यांचा होकार मिळाल्यानंतर मंत्रिमंडळानेही त्याला मंजूरी दिली. कोरग्रुपच्या अध्यक्षा सोनिया गांधी असल्यामुळे हे प्रकरण पुन्हा कोरग्रुपकडे येईल आणि त्यानंतर अध्यादेश मागे घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होईल.

सुत्रांनी हे देखील स्पष्ट केले की, पक्षातील अंतर्गत घडोमोडींनी वेग घेतला आहे. राहुल यांना अध्यादेशासंदर्भात जी माहिती मिळाली होती त्या आधारावर त्यांनी वक्तव्य केले होते. त्याआधी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून अध्यादेशाला असलेला विरोध व्यक्त केला होता. त्यांचे असे करणे सरकारच्या विरोधात गेल्या सारखे होईल असे वाटल्यामुळे त्यांनी कठोर शब्दात आपले मत मांडले. भविष्यात त्यांच्या या पवित्र्यावर पक्षाच्या बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता आहे. सध्या मात्र सरकारची अडचण वाढली आहे. त्यांना अध्यादेशासह ते विधेयकही मागे घ्यावे लागणार आहे जे कलंकित नेत्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापासून वाचवण्यासाठी राज्यसभेत सादर करण्यात आले होते. यासाठी मात्र संसदेच्या अधिवेशनाची वाट पाहावी लागणार आहे. ऐकूण, पंतप्रधान परदेश दौ-यावरून परत येई पर्यंत अध्यादेश राष्ट्रपतींकडे पडून राहाणार हे निश्चित आहे.

पुढील स्लाइडमध्ये, राहुल गांधींच्या निर्णयाने याआधीही पक्षनेते झाले होते चकित