आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi May Like To Be Congress President Through Internal Poll: Veerappa Moily

राहुल गांधी पुढील महिन्यात काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणार? वीरप्पा मोईलांनी दिले संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास राहुल गांधी यांनी नुकताच होकार दर्शवला होता. - Divya Marathi
पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास राहुल गांधी यांनी नुकताच होकार दर्शवला होता.
नवी दिल्ली - राहुल गांधींनी कॅलिफोर्निया विद्यापीठातील मुलाखतीत पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्यास होकार दर्शवला होता. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्प मोईली यांनी राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष होतील असे संकेत दिले आहे. काँग्रेसमधील पक्षांतर्गत निवडणुकीद्वारे ते अध्यक्षपदी निवडले जाऊ शकतात, असे मोईली म्हणाले. कॅलिफोर्नियातील मुलाखतीत त्यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याचीही तयारी दर्शवली होती. 
 
पक्षात मोठे बदल होतील... 
- मोईली म्हणाले, राहुल गांधींनी पक्षाची जबाबदारी स्वीकारणे हे पक्षासाठी गेम-चेंजर ठरू शकते. 
- ते म्हणाले, 'त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी लवकरात लवकर स्वीकारावी. हे पक्षासाठी आणि देशासाठीही चांगले राहिल.'
- मोईली म्हणाले, 'ही प्रत्येकाचीच भावना आहे की त्यांनी पद स्वीकारण्यास उशिर केला आहे. मात्र ते (राहुल गांधी) अंतर्गत निवडणुकीची वाट पाहात आहेत. त्यांची इच्छा आहे की एआयसीसी (ऑल इंडिया काँग्रेस कमिटी) च्या निवडणुकीतूनच त्यांची निवड व्हावी.'
या महिन्यात प्रक्रिया होणार पूर्ण 
- मोईली म्हणाले की राज्यांमध्ये या निवडणुकीची तयारी या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एआयसीसीची प्रक्रिया पूर्ण होईल. 
- त्यांना विचारण्यात आले, की पुढील महिन्यापर्यंत राहुल ही जबाबदारी स्वीकारु शकतात? त्यावर मोईली म्हणाले, 'शक्य आहे!' 
 
काँग्रेसच्या आपेक्षा उंचावल्या 
- मोईली म्हणाले राहुल गांधी यांच्याकडे नवा दृष्टीकोण आणि नवी पद्धती आहे. 
- काँग्रेसचा विश्वास वाढवण्यासाठी काय करण्याची गरज आहे, असे विचारले असता मोईली म्हणाले, राहुल गांधी त्यासाठी काम करत आहेत. प्रत्येक राज्याचा वेगळा प्रश्न आहे. प्रत्येक राज्याची वेगळी स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल, फक्त विधानसभेसाठी नाही तर आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी करावी लागेल. 
बातम्या आणखी आहेत...